'सकाळ' ने प्रश्न मांडून न थांबता उत्तरही दिले...

दीपक कच्छवा
मंगळवार, 26 जून 2018

मेहुणबारे (चाळीसगाव) : शासनाचे 'पाणी अडवा पाणी जिरवा' या उपक्रमाअंतर्गत जलयुक्त शिवार अभियान राबविले आहे. त्याला 'सकाळ' ची मोलाची साथ लाभली आहे. सुरवातीला धामणगाव (ता.चाळीसगाव) येथील पाणीप्रश्न माडंला व 'तनिष्का' च्या माध्यमातून 'सकाळ' रिलीफ फंडा तून नाला खोलिकरणाचे काम पुर्ण केले. त्यामुळे 'सकाळ' प्रश्नासोबत उत्तरही शोधुन दिल्याची बोलकी प्रतिक्रीया धामणगावकरांनी आज 'सकाळ'चे सामुहिक वाचन करताना व्यक्त केली.

गावात आनंदाचे वातावरण 
आतापर्यंत धामणगावला पाणीटंचाई भासत होती. नाला खोलिकरणाच्या कामामुळे आतापासूनच पाणी साचल्याने येथील पाणी टंचाई दुर झाली आहे.त्यामुळे धामणगाव हे गाव आता जळगाव जिल्ह्यापुरता मर्यादित राहिले नसुन या कामामुळे संपुर्ण महाराष्ट्रात चर्चेत आले आहे. आज  गावातील विठ्ठल मदिराजवळ ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. आपल्या गावाची बातमी 'सकाळ' मध्ये आल्याने जेष्ठ नागरिकांनी ती वाचुन 'सकाळ' माध्यम समूहाने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक करून धन्यवाद दिले.

'सकाळ' मुळे गाव झाले जलयुक्त
या भागातील शेतीसाठी हे पाणी उपयुक्त ठरणार आहे. शेतात आपल्याला हवे तसे उत्पन्न घेण्याचे सोयीस्कर होईल. 'सकाळ' व उज्वलदादांच्या चांगल्या विचारामुळे धामणगाव आज जलयुक्त झाले आहे.
- काजल निकम (विद्यार्थीनी) 

विहिरींना पाण्याचा लाभ 
धामणगाव परिसरात दहा वर्षांत पहिल्यांदा असा पाऊस पडला.ज्यामुळे नाल्यात  साचलेल्या पाण्याने विहीरीच्या  पातळीत वाढ होणार आहे. 
- ​रमेश निकम (शेतकरी)

नाला खोलिकरणाचे काम चांगले झाले आहे. पन्नास वर्षांत असे कोणीच काम केले नाही. या भागातील पाणीटंचाई सोबत सिंचनाचा प्रश्न देखील सुटण्यास मदत झाली आहे. 
- संजय देशमुख (शेतकरी) 

धामणगावाचे सुपुत्र जलदुत डॉ. उज्वलकुमार चव्हाण व सकाळ माध्यम समूहाच्या  'तनिष्का' मुळे नाला खोलिकरणाच्या कामाचा निश्चित फायदा होईल. गावाच्या चोहीकडे पाणीच पाणी झाल्याने आनंदाचे वातावरण आहे.
- सुनिल पवार (शेतकरी) 

Web Title: sakal gives answer also