सकाळ इम्पॅक्ट, काम न करता पगार घेण्याऱ्या डॉक्टरवर कारवाई

अमोल खरे
शनिवार, 28 जुलै 2018

मनमाड - मनमाड उपजिल्हा रुग्णालयात एकही दिवस सेवा न देता पगार काढणारा डॉक्टर व त्याला पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठांची चौकशी करावी यासंदर्भात 'सकाळ'मध्ये 'हजर शून्य दिवस वेतन सहा महिन्यांपासून' या मथळ्याची बातमी प्रसिद्ध झाली होती बातमीची व तक्रारीची दखल घेत आज त्रिसदस्यिय चौकशी समितीने रुग्णालयात कागदपत्रांची व संबंधितांची चौकशी करून अहवाल वरिष्ठांना सादर करणार असल्याचे सांगितले. 

मनमाड - मनमाड उपजिल्हा रुग्णालयात एकही दिवस सेवा न देता पगार काढणारा डॉक्टर व त्याला पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठांची चौकशी करावी यासंदर्भात 'सकाळ'मध्ये 'हजर शून्य दिवस वेतन सहा महिन्यांपासून' या मथळ्याची बातमी प्रसिद्ध झाली होती बातमीची व तक्रारीची दखल घेत आज त्रिसदस्यिय चौकशी समितीने रुग्णालयात कागदपत्रांची व संबंधितांची चौकशी करून अहवाल वरिष्ठांना सादर करणार असल्याचे सांगितले. 

शासनाच्या नियमानुसार नवीन डॉक्टर झालेल्या उमेदवारांना शासकीय रुग्णालयात सेवा देणे बंधनकार असल्याने वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. मयूर प्रमोद पंजाबी (एम.डी.मेडीसीन) हे मनमाड उपजिल्हा रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून कागदोपत्री सेवा देऊ लागले आणि शासनाचा गलेलठ्ठ पगार घेऊ लागले. शासनाच्या सर्व सवलती त्यांनी घेतल्या मात्र प्रत्यक्षात सेवा संपेपर्यंत डॉ पंजाबी हे रुग्ण तपासणी करतांना कोणालाही आढळुन आले नाही. पंजाबी नावाचे डॉक्टर आहे हेच मुळी कुणालाही माहीत नव्हते. मात्र हा सर्व प्रकार वैद्यकीय अधिक्षक डॉ.जी.एम.नरवणे यांच्या कृपाशीर्वादाने कागदोपत्री केला जात होता. शासनाच्या पैशाची उधळपट्टी आणि फसवणूक होत असून, या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी असे तक्रारपत्र रिपाइंचे युवा शहराध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली होती. तर त्या अनुषंगाने दि १२ जूनच्या 'सकाळ'मध्ये हजर शून्य दिवस वेतन सहा महिन्यांपासपासून या मथळ्याही बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीची व तक्रारदाराची दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सकांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, मुख्य प्रशासकीय अधिकारी व्ही.डी.पाटील, मानदतज्ञ पी.जी. बरदापुरकर यांच्या नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने आज रुग्णालयात येऊन चार तास चौकशी केली.

यावेळी बोलतांना डॉ पवार म्हणाले की डॉ पंजाबी यांनी रुग्णालयात केलेल्या कामकाजाच्या, रुग्णापत्रिका, अंतररुग्णापत्रिका नोंदी, पी. एम. रिपोर्ट, केस तपासणीच्या सीट्स, अदा केलेले वेतन व इतर सर्व कागदपत्रांची छाननी केली, डॉ नरवणे, तक्रारदार गुरुकुमार निकाळे व संबंधितांची चौकशी केली. चौकशीच्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी समिती समोर आल्या आहे. त्याचा उहापोह आणि एकत्रित निर्णय अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्यसेवा परिमंडळाचे उपसंचालक यांना सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची व तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आज त्रिसदस्यीय चौकशी समितीने मनमाड उपजिल्हा रुग्णालयात चौकशी केली असून वरिष्ठांना गोपनीय अहवाल सादर केला जाणार आहे 
- डॉ अनंत पवार, चौकशी समिती सदस्य 

सेवा न देता वेतन काढणारे डॉ पंजाबी, त्यांना पाठीशी घालणारे डॉ नरवणे यांच्या चौकशीची मागणी केली होती तक्रारदार म्हणून चौकशी समितीने माझी चौकशी केली डॉक्टरांनी शासनाची फसवणूक केल्याचे सर्व कागदपत्रे सादर केली समितीने निःपक्षपातीपणे चौकशी करून अहवाल सादर करावा - गुरुकुमार निकाळे, तक्रारदार

Web Title: sakal impact, Action taken on doctor