Sakal Impact : जामफळ प्रकल्पाची तोडलेली जलवाहिनीबाबत कुणाल पाटील यांचे पाटबंधारे विकास मंडळाला पत्र

MLA Kunal Patil
MLA Kunal Patilesakal

Dhule News : सोनगीरच्या मुख्य जलवाहिनी तोडल्याने महिन्यातून फक्त तीनदा पाणीपुरवठा होत आहे. ‘सकाळ’ने बुधवारी (ता. २६) ‘सोनगीरला पाणीटंचाई’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर पाणीटंचाईच्या बातमीची दखल आमदार कुणाल पाटील यांनी घेतली आहे. (sakal impact Disruption of Jamphal project Aqueduct should be restored with repairs Kunal Patil letter to Irrigation Development Board dhule news)

पाणीटंचाई दूर करण्यासाठी जामफळ प्रकल्पातील मुख्य स्त्रोतांची तोडलेली जलवाहिनी दुरुस्तीसह पूर्ववत जोडावी अशी सूचना आमदार कुणाल पाटील यांनी जळगाव तापी पाटबंधारे विकास मंडळाचे मुख्य अभियंता श्री. बोरकर यांना पत्राद्वारे केली आहे.

सोनगीर (ता.धुळे) हे सुमारे तीस हजार लोकवस्तीचे गाव असून प्रसिद्ध बाजारपेठ आहे. भांडी तयार करण्यासह अन्य लघुउद्योग व व्यापार प्रसिद्ध आहे. परिसरातील ३५ खेड्यांचा दैनंदिन संपर्क येतो. त्यामुळे पाण्याची मागणी वाढते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

MLA Kunal Patil
Dhule News : धुळ्यात विलंबासह दूषित पाणी; दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्याच्या नागरिकांच्या तक्रारी

एप्रिलच्या सुरवातीलाच पाझर तलाव आटला. सार्वजनिक विहिरीत पाणी नाही. सर्व स्रोत आटण्याच्या मार्गावर आहेत. जामफळ धरणाचे विस्तारीकरणात मुख्य स्त्रोतांची जलवाहिनी काढून टाकण्यात आली आहे. ही जलवाहिनी जोडून सोनगीरची पाणी टंचाई दूर व्हावी यासाठी आमदार पाटील यांनी मुख्य अभियंत्यांना पत्र दिले आहे.

आमदार पाटील यांनी अधीक्षक अभियंता, धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळ धुळे आणि कार्यकारी अभियंता, जामफळ सुलवाडे कनोली उपसा सिंचन योजना धुळे यांच्याशी संपर्क करून जामफळ धरणाच्या विस्तारीकरणाच्या कामात तुटलेली मुख्य स्त्रोतांची जलवाहिनी तातडीने जोडून पूर्ववत करावी अशी सूचना केली आहे. जलवाहिनी जोडल्यानंतर सोनगीरचा पाणी पुरवठा सुरळीत होऊन पाणीटंचाई दूर होण्यास मदत होईल. अशी माहिती आमदार कुणाल पाटील यांनी दिली.

MLA Kunal Patil
Dhule News : नवीन शौचालये सुरू न करण्यामागे काय इंटरेस्ट? सार्वजनिक शौचालयांचा प्रश्‍न

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com