सकाळ'तर्फे नाशिकमध्ये 15 व 16 ला बहरणार "इनोव्हेशन फेस्ट' 

live photo
live photo

नाशिक, ता. 2 ः मानवी जीवनातील प्रत्येक टप्प्यावर उन्नत व्हायला मदत करणारी व्यवस्था उभी करणे. त्यासाठी सहयोग आणि समृद्धी या सूत्राच्या आधारावर "सकाळ'ने आराखडा तयार केला आहे. या प्रवासात आपल्यासाठी शिकणाऱ्याची अथवा शिकवणाऱ्याची भूमिका असू शकते. याच अनुषंगाने "सकाळ'तर्फे आज 29 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून "इनोव्हेशन फेस्ट' उपक्रमाची घोषणा करण्यात आली. 

"सकाळ'च्या सातपूर कार्यालयात प्राध्यापक, प्राचार्य आणि उद्योजकांची बैठक "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यासाठी प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, अविनाश शिरोडे, डॉ. एन. एस. पाटील, गिरीश पगारे, डॉ. गिरीश साने, प्राचार्य प्रशांत पाटील, प्राचार्य डॉ. बी. जी. वाघ, डॉ. व्ही. एस. माने, डॉ. राजेंद्र भांबर, सुरेश पटेल, चारुदत्त म्हसदे, रोशन पाटील, कौस्तुभ सराफ, प्रवीण भंडारी, पवन रहाणे, डॉ. योगेश गोसावी, प्रा. एच. बी. मिशाल, डॉ. व्ही. जे. गोंड, डॉ. व्ही. एम. शेवलीकर, विशाल जोशी, सचिन उशीर आदी उपस्थित होते. सामाजिक, आर्थिक प्रश्‍नांचे उत्तर विज्ञान अन्‌ तंत्रज्ञानामध्ये असल्याने "सकाळ'तर्फे राबवण्यात येत असलेला उपक्रम समाजाच्या उन्नतीला हातभार लावणारा ठरेल, अशी प्रतिक्रिया उपस्थितांमधून व्यक्त झाली. "इनोव्हेशन' उपक्रमात संकल्पना त्याच्या सविस्तर माहितीसह स्विकारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. उपक्रमासाठी प्राप्त होणाऱ्या संकल्पना, प्रकल्पांमधून निवड समितीतर्फे "इनोव्हेशन फेस्ट'साठी निवड केली जाईल. त्यातून परीक्षण समितीतर्फे विजेत्यांची निवड केली जाईल आणि "सकाळ'च्या 17 मार्चला होणाऱ्या वर्धापनदिनाच्या विशेष सोहळ्यात विजेत्यांना सन्मानित करण्यात येईल. 

आपल्या अवतीभोवतीच्या सगळ्या समस्यांचे उत्तर विज्ञान-तंत्रज्ञानात आहे या विश्‍वासातून "इनोव्हेशन फेस्ट' संकल्पना पुढे आली. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना, आविष्कार जगापुढे यावेत. त्याचे भविष्यात उद्योगात रुपांतर व्हावे यासाठीचा प्रयत्न आहे. "इनोव्हेशन फेस्ट'मध्ये आय. टी., कृषी, आरोग्य, उद्योग, सेवा आदी क्षेत्रातील आविष्कार सादर करता येतील. त्यासाठी "सकाळ'तर्फे स्टॉल उपलब्ध करुन देण्यात येतील, असे श्री. माने यांनी बैठकीच्या सुरवातीला स्पष्ट केले. 
सहभागासाठी 12 मार्च अंतीम मुदत 
"इनोव्हेशन फेस्ट'मध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, व्यावसायिक, शेतकरी यांनी साकारलेले आविष्कार पाठवावयाचे आहेत. प्रवेश अर्जासमवेतची माहिती आणि तपशील पाठवण्याची अंतीम मुदत 12 मार्चपर्यंत राहील. विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकांना त्यांचे अर्ज शाळा-महाविद्यालयाच्या माध्यमातून "सकाळ'कडे जमा करावयाचे आहेत. इतरांनी आपले अर्ज "सकाळ'कडे जमा करता येतील. "सकाळ'च्या नाशिकमधील सातपूर कार्यालयात अर्ज व तपशील पाठवायचे आहेत. 

"इनोव्हेशन फेस्ट'चे गट 
0 अभियांत्रिकी (आय. टी., इलेक्‍ट्रीकल, ऑटोमोबाईल, इंजिनिअरींग) 
0 सार्वजनिक सेवा (कृषी, औषधनिर्माणशास्त्र, आरोग्य, वास्तुविशारद, विज्ञान) 
0 खुला (विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, शेतकरी, व्यावसायिक) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com