द्राक्षे भुईसपाट.. वीज पुरवठाही खंडीत 

Live Photo
Live Photo

अंबासन, (जि.नाशिक) : फोपीर (ता.बागलाण) येथे सोमवारी (ता.28) रात्री साडेआठच्या सुमारास झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतीपिकांसह द्राक्षे बागांचे अतोनात नुकसान झाले. अनेक ठिकाणी द्राक्षे बागा वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाल्याने द्राक्षे उत्पादकांना लाखोंचा फटका बसला आहे. आधीच परतीच्या पावसाने द्राक्षे मन्यांना तडे गेलेले असल्याने आता वादळी वाऱ्यामुळे उभा असलेला बाग आडवा होतांना पाहून द्राक्षे उत्पादक मोठ्या संकटात सापडले आहेत. 
तालुक्‍यातील पिंगळवाडे, करंजाड, बिजोटे, फोपीर, इजमाने, मुगंसे, वायगाव आदी भागात परतीच्या पावसामुळे द्राक्षे उत्पादकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. त्यातच ऐन दिवाळीच्या दिवशी वादळी वारे व धुवांधार पावसाने झोडपल्याने बाजरी, मका, कांद्याला मोठा फटका बसला आहे. फोपीर येथील संदिप दादाजी भामरे यांनी अडीच एकर क्षेत्रात द्राक्षे लागवड केली असून रात्रीच्या वादळी वाऱ्यामुळे काढणीला आलेली द्राक्षे बाग भुईसपाट झाल्याने त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून गाव व परिसरात वीजेच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडीत झाला आहे. तालुक्‍यातील अन्य विविध गावांतील शेतकऱ्यांची परीस्थिती फारशी वेगळी नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com