सारेच पक्ष जिंकले, अन्‌ शेतकरी हारला... 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

नाशिक : सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पडसाद सोशल मिडीयावरदेखील पडत आहेत. नुकताच विधानसभा निवडुका झालेल्या असतांना, यात सारेच पक्ष जिंकले, अन्‌ हारला तो शेतकरी. अशा भावनिक संदेशातून बळीराजाच्या दु:खांना वाट करून देण्याचा प्रयत्न केला जातोय. 

"सोयाबीन, मका यांना कोम फुटले, कांद्याचे रोप सडले. महाराष्ट्रात ना कॉंग्रेस-राष्ट्रवादी हारली, ना सेना-बीजेपी हारली, ना वंचित-मनसे हारली, हारला तो फक्‍त आमचा शेतकरी.' अशा आशयाचा संदेश सध्या सोशल मिडीयावर शेअर केला जातो आहे. हाताशी आलेले पीक शेतात भिजत आहे. आभाळाकडे तोंड करून, नशीबाला दोष देत रडत आहे. राजकीय पक्षांना केवळ सत्ता स्थापनेची चिंता असून, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे मात्र कुणीही बघायला तयार नाही याबद्दल खेद व्यक्‍त केला जात आहे. शेती व शेतकऱ्यांची होत असलेली अपरीमित हाणी लक्षात घेता, तातडीने उपाययोजना करण्याची आवश्‍यकतादेखील व्यक्‍त करण्यात येत आहे. फेसबुक, व्हॉट्‌अप सारख्या सोशल मिडीयावर आपले नातेवाईक, मित्र परीवाराला दिवाळीच्या शुभेच्छा देण्याऐवजी आपल्या विवंचणा व्यक्‍त करण्याची वेळ शेतकरी बांधवांवर ओढावली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Agricultural Effect