परावलंबित्वामुळे सत्तर टक्के मार्केटकडे दुर्लक्ष

Residencial Photo
Residencial Photo

नाशिक - ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज मध्ये मंदी आल्याने त्याचा फटका नाशिक मधील महिंद्रा व बॉश या कंपनीला बसला असून त्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन कमी झाले, याच कंपन्यांवर अनेक छोटे विक्रेते (व्हेंडर) अवलंबून असल्याने त्यांच्या मध्ये मोठी भिती निर्माण झाली आहे. परंतू मोठ्या कंपन्यांच्या तीस टक्के मार्केटवर अवलंबून राहून 70 टक्के ओपन मार्केटकडे लक्ष केंद्रीत केल्यास भविष्यात स्वताचा बॅण्ड निर्माण होवू शकतो. त्यासाठी नाशिक मध्ये छोट्या व्हेंडरने एकत्र येण्याचे आवाहन फेडरेशन ऑफ ऑल इंडिया स्पेअर पार्टस डिलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय सोनवणे यांनी केले.
ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज मध्ये मंदी निर्माण झाली. नाशिक मध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज वर साठ छोटे व्हेन्डर अवलंबून आहेत. मोठ्या कंपन्यांबरोबरचं छोटे व्हेंडर देखील मंदीमुळे हादरले असून आता पुढे काय होईल अशी भिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर श्री. सोनवणे यांनी मंदीतून मार्ग काढण्यासाठी "सकाळ' शी संवाद साधला. ते म्हणाले, ऑटोमोबॉईल इंडस्ट्रीज मधील मोठ्या कंपन्या फक्त वाहनांचे डिझाईन, चेसीज तयार करतात. इतर सामग्री जसे बॉडी, गिअर बॉक्‍स, फ्युअर सिस्टम, प्रोपेलर शाफ्ट, टायर, बेअरींग, ईलेक्‍ट्रॉनिक्‍स पार्ट अन्य छोट्या कंपन्यांकडून पुरवठा होतो. पुरवठादारांकडून वाहन तयार होताना एकदाचं पुरवठा होतो परंतू रस्त्यावर वाहन उतरल्यानंतर देखील वाहनांना अनेक पार्टसची आवशक्‍यता भासते. ती सामग्री सत्तर टक्के उपलब्ध असलेल्या ओपन मार्केट मधून प्राप्त होते. परंतू व्हेंडर कडून ही बाब दुर्लक्षित होत असल्याने इंडस्ट्रीजवर मोठे संकट कोसळल्याची भिती निर्माण झाली आहे. इनोव्हा रबर, आनंद बेअरींग, परफेक्‍ट सर्कल, महिंद्रा ड्राईव्ह लाईन, बॉश या कंपन्यांनी तीस टक्के मोठ्या कंपन्यांच्या मार्केट ऐवजी सत्तर टक्के खुल्या बाजाराकडे लक्ष दिल्याने स्वताचे बॅण्ड विकसित केले. त्याच धर्तीवर उत्पादनाच्या कौशल्या ऐवजी मार्केटिंगचे कौशल्य विकसित झाल्यास नवीन ब्रॅण्ड निर्माण करता येईल. ऑटोमोबाईल क्षेत्रातील चिंतेचे कारण स्पष्ट करताना श्री. सोनवणे यांनी मोठ्या कंपन्यांवरील शंभर टक्के परावलंबित्व व जोखिम उचलण्याची मानसिकता नसल्याचे सांगितले.

ईलेक्‍ट्रीक वाहनांमुळे अधिक नुकसान
सरकारने टप्प्याटप्याने डिझेल वाहने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आज ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज मध्ये मंदी असली तरी भविष्यात डिझेल इंजिन बंद होणार असल्याने या उद्योगावर मोठे आरिष्ट कोसळणार आहे. डिझेल इंजिनमुळे अडिच हजार पार्टस विक्री होतात. ईलेक्‍ट्रीकल वाहनांना अडिचशे स्पेअरपार्टस लागतात त्यामुळे या उद्योगा मधील चेंज ओव्हरचा आताचं विचार करणे गरजेचे असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

नाशिक मधील छोट्या व्हेंडरने एकत्र येवून एखादा ब्रॅण्ड विकसित करण्याबरोबरचं परराज्यात मार्केटींग केल्यास परावलंबित्व संपेल.- संजय सोनवणे, उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ ऑल इंडिया स्पेअर पार्टस डिलर्स असोसिएशन.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com