अटल पेन्शन योजना जनजागृती कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

नाशिक ः अटल पेन्शन योजनेच्या जनजागृतीसाठी बॅंकांतर्फे मोहिम राबवण्यात येत आहे. अधिक ग्राहकांना योजनेत सहभागी करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. योजनेच्या प्रचार व प्रसारासाठी राज्यातील निवड सात शहरांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येत असून त्यात नाशिकचा समावेश आहे. अमृतधाम येथील आशादीप मंगल कार्यालयात नुकतीच त्यातंर्गतची "टाऊन हॉल मिटींग' झाली. बॅंक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय व्यवस्थापक बाळासाहेब टावरे, जिल्हा अग्रणी बॅंक अधिकारी भरत बर्वे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

नाशिक ः अटल पेन्शन योजनेच्या जनजागृतीसाठी बॅंकांतर्फे मोहिम राबवण्यात येत आहे. अधिक ग्राहकांना योजनेत सहभागी करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. योजनेच्या प्रचार व प्रसारासाठी राज्यातील निवड सात शहरांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येत असून त्यात नाशिकचा समावेश आहे. अमृतधाम येथील आशादीप मंगल कार्यालयात नुकतीच त्यातंर्गतची "टाऊन हॉल मिटींग' झाली. बॅंक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय व्यवस्थापक बाळासाहेब टावरे, जिल्हा अग्रणी बॅंक अधिकारी भरत बर्वे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऍथॉरिटीचे प्रशिक्षक राजकुमार यांनी उपस्थित बॅंकर्स आणि नोंदणीधारकांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी अटल पेन्शन योजनेत चांगले काम केल्याबद्दल घोटीच्या बॅंक ऑफ इंडिया आणि युनियन बॅंक ऑफ इंडिया, गोंदेदुमालाच्या बॅंक ऑफ महाराष्ट्र, मनमाड व ब्राह्मणगावच्या बॅंक ऑफ बडोदा, अभोणा-पेठ व घोटीच्या स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Banking