पुरग्रस्ता निधी संकलनातही भाजप मध्ये "ताणाताणी'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

नाशिक, - महाराष्ट्रातील पुरग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी भाजपकडून प्रदेश पातळीवरून आपत निधी उभारण्याचे फर्मान निघाल्यानंतर प्रोटोकॉल प्रमाणे महापालिकेच्या गटनेत्यांमार्फत नगरसेवकांना आवाहन करून निधीची जमवाजमव होणे अपेक्षित असताना त्यापुर्वीचं महापौर रंजना भानसी यांनी निधी देण्यासाठी परस्पर पत्र काढल्याने या विषयावरून भाजप मध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झाल्याचे आज पाहायला मिळाले. गटनेते जगदीश पाटील यांनी महापौरांच्या भुमिकेवर नाराजी व्यक्त करताना नगरसेवकांना आवाहन केल्यानंतर आज 69 नगरसेवकांची तब्बल दहा लाख 35 हजार रुपये मानधन जमा करण्यास नगरसेवकांनी सहमती दर्शविली.

महाराष्ट्रात विशेष करून पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात मोठा महापुर आल्याने जिवित व वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली. सर्वचं राजकीय पक्षांकडून आर्थिक मदतीचा ओघ सुरु झाला. शिवसेनेने मंगळवारी सर्व 37 नगरसेवकांचे मासिक मानधन पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे सोपविणार असल्याचे जाहिर केल्यानंतर भाजपकडूनही आज प्रदेश पातळीवरून आलेल्या पत्रानुसार निधी नगरसेवकांचे मासिक मानधन संकलित करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रदेश पातळीवरून सुचना आल्याने महापौरांनी तातडीने पत्र काढतं नगरसेवकांना आवाहन केले. परंतू प्रोटोकॉल नुसार महापालिकेतील गटनेत्यांनी नगरसेवकांची बैठक बोलावून त्यात आवाहन करणे अपेक्षित असताना महापौरांकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न झाल्याने त्यातून पक्षांतर्गत वाद निर्माण झाले. सकाळच्या सत्रात गटनेते जगदीश पाटील यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर त्यांनी दालनात बैठक बोलाविली. त्यात नगरसेवकांना आवाहन करण्यात आले. भाजपचे महापालिकेत निवडून आलेले 66 तर स्विकृत तीन नगरसेवक आहेत. सर्वांचे प्रत्येकी पंधरा हजार रुपये मानधन पक्षाकडे मदत स्वरुपात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakal news bjp controversy