दैवज्ञ सोनार धर्मशाळेत हरिनाम सप्ताह 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

त्र्यंबकेश्‍वर ः येथील दैवज्ञ सोनार समाज धर्मशाळेत श्रावण महिना आणि धर्मशाळा जीर्णोद्धारानिमित्ताने हरिनाम सप्ताह व गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा झाला. तीन दिवस चाललेल्या कार्यक्रमात चिमुरड्या वारकऱ्यांचा मेळा रंगला. हरिनाम सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. भोसरीचे श्रीराम बेलेकर, देहू रोडचे चंद्रकांत बेल्हेकर यांचे प्रवचन, ह. भ. प. माधव महाराज, विठ्ठलराव महामुनी, घोटीचे सरपंच मनोहर घोडे यांचे कीर्तन झाले. विलास टकले अध्यक्षस्थानी होते. महामंडलेश्वर स्वामी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. बाल कीर्तनकार आणि वारकऱ्यांचा सहभाग राहिला.

त्र्यंबकेश्‍वर ः येथील दैवज्ञ सोनार समाज धर्मशाळेत श्रावण महिना आणि धर्मशाळा जीर्णोद्धारानिमित्ताने हरिनाम सप्ताह व गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा झाला. तीन दिवस चाललेल्या कार्यक्रमात चिमुरड्या वारकऱ्यांचा मेळा रंगला. हरिनाम सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. भोसरीचे श्रीराम बेलेकर, देहू रोडचे चंद्रकांत बेल्हेकर यांचे प्रवचन, ह. भ. प. माधव महाराज, विठ्ठलराव महामुनी, घोटीचे सरपंच मनोहर घोडे यांचे कीर्तन झाले. विलास टकले अध्यक्षस्थानी होते. महामंडलेश्वर स्वामी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. बाल कीर्तनकार आणि वारकऱ्यांचा सहभाग राहिला. लक्ष्मी दामोधर फाकटकर ट्रस्ट्रचे अध्यक्ष श्रीकृष्ण दामोधर फाकटकर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि धर्मशाळा जीर्णोद्धारसाठी मदत करणाऱ्या देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. धर्मशाळेचे अध्यक्ष सूर्यकांत बेलेकर अध्यक्षस्थानी होते. सुरेंद्र खोल्लम, रवींद्र खोल्लम, रामदास वाडेकर, भाउसाहेब बेलकर, नंदकुमार फाकटकर, श्‍यामकांत बेदरकर आदी उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Culture