किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

नाशिक ः किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातंर्गत आज दुसऱ्या दिवशी धन्वंतरी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अँड टेक्‍नॉलॉजीमध्ये प्लास्टिक प्रदूषणावर मात या विषयावर चर्चासत्र झाले. ओला-सुका-प्लास्टिक कचरा, घंटागाडी, घराघरापर्यंत जाऊन कचरा उचलणारे कर्मचारी अशा विविध पातळ्यांवर वैयक्तिक चर्चा करून प्लास्टिकचा वापर कमी करावा असा सूर व्यक्त झाला. प्लास्टिपिशव्या उत्पादक आणि वापरकर्ते यांच्यावर केवळ दंडात्मक कारवाई करून उपयोग नसून जनजागृती महत्वाची आहे. केंद्र सरकारकडून येत्या गांधी जयंतीपासून लागू होणाऱ्या प्लास्टिक बंदीसाठी मोठ्याप्रमाणात जनजागृती होण्याची गरज आहे, अशी चर्चा यावेळी झाली.

नाशिक ः किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातंर्गत आज दुसऱ्या दिवशी धन्वंतरी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अँड टेक्‍नॉलॉजीमध्ये प्लास्टिक प्रदूषणावर मात या विषयावर चर्चासत्र झाले. ओला-सुका-प्लास्टिक कचरा, घंटागाडी, घराघरापर्यंत जाऊन कचरा उचलणारे कर्मचारी अशा विविध पातळ्यांवर वैयक्तिक चर्चा करून प्लास्टिकचा वापर कमी करावा असा सूर व्यक्त झाला. प्लास्टिपिशव्या उत्पादक आणि वापरकर्ते यांच्यावर केवळ दंडात्मक कारवाई करून उपयोग नसून जनजागृती महत्वाची आहे. केंद्र सरकारकडून येत्या गांधी जयंतीपासून लागू होणाऱ्या प्लास्टिक बंदीसाठी मोठ्याप्रमाणात जनजागृती होण्याची गरज आहे, अशी चर्चा यावेळी झाली. वसुंधरा क्‍लबचे वीरेंद्र चित्राव, हेमंत बेळे, अमित टिल्लू आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना रणथंभोरची राणी नूर क्वीन, द क्रो, खुले आकाश ताळे धूंधू बसेरा, ओशन पोल्युशन, देवराई,उमरेड जंगल सफारी हे लघू आणि माहितीपट दाखवण्यात आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Environment