अधीक्षक अभियंता राजेश मोरेंचा जलसंपदाकडून गौरव 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

नाशिक ः सोलापूरमध्ये 2015-16 मध्ये पाणीवापर संस्थांकडे प्रकल्प हस्तांतरण करणे, सिंचन परिषद घेणे या कामाची दखल घेत जलसंपदा विभागाने नाशिकचे अधीक्षक अभियंता राजेश मोरे यांचा गौरव केला आहे. त्यांच्यासोबत मंत्रालयातील उपसचिव ज्ञा.आ. बागडे यांच्या कोयना सिंचन विभागातील कामाचीही दखल घेण्यात आली आहे. 

श्री. मोरे हे त्यावेळी कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होते. जलसंपदा विभागातील प्रकल्प आणि योजना राबवतांना अभियंत्यांचे तांत्रिक व प्रशासकीय कौशल्यपणाला लागते. अशावेळी विशेष वैयक्तिक कौशल्य व गुणवत्ता आढळून येते आणि विकासात ही बाब महत्वाचा वाटा असतो. त्यांच्या उत्कृष्ट कामाचे कौतुक व्हावे आणि प्रोत्साहन मिळावे,यासाठी उत्कृष्ट अभियंत्यांना वैयक्तिक प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येते. त्यासंदर्भातील नोंद सेवापुस्तकात घेण्यात येते. हा गौरव प्राप्त झालेल्या इतर अभियंता असे ः मंत्रालयातील उपसचिव र. रा. शुक्‍ला, कार्यकारी अभियंता श्रीराम हजारे (बुलढाणा), फलटणचे तत्कालिन सहाय्यक अभियंता योगेश सावंत, वाशिमचे तत्कालिन शाखा अभियंता बबन राठोड, महूद (जि. सोलापूर) येथील तत्कालिन शाखा अभियंता श्रीरंग ठवरे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Government