चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशनतर्फे  शुक्रवारपासून जीएसटीवर राष्ट्रीय परिषद 

residentional photo
residentional photo

नाशिक  चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशनच्या नाशिक शाखेतर्फे अशोका मार्गावरील आयसी भवनात शुक्रवार(ता. 23)पासून दोनदिवसीय "जीएसटी' विषयावर राष्ट्रीय परिषद होत आहे. या परिषदेला जीएसटी आयुक्त टिळेकर, सहाय्यक आयुक्त संजय पोखरकर उपस्थित राहतील. 

येत्या शुक्रवारी सकाळी साडेनऊला परिषदेचे उद्‌घाटन होईल. चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशनचे अध्यक्ष मिलन लुणावत, उपाध्यक्ष रेखा पटवर्धन, सचिव रणधीर गुजराथी, खजिनदार हर्षल सुराणा, माजी अध्यक्ष रोहन आंधळे, माजी अध्यक्ष विकास हसे, रवी राठी, राजेंद्र शेटे उपस्थित राहतील. उद्‌घाटनानंतरच्या पहिल्या सत्रात शेफाली गब्रिवाल, द्वितीय सत्रात दीपक गुप्ता, तर तृतीय सत्रात आशित शाह जीएसटीसंदर्भात विविध विषयांवर मार्गदर्शन करतील.

शनिवारी (ता. 24) दुसऱ्या दिवशी तिसरे सत्र होईल. त्यात अविनाश पिद्दार "क्रिटिकल इश्‍यू इन इनवर्ड सप्लाय' या विषयावर मार्गदर्शन करतील. दुसऱ्या सत्रात गुरजित बुल्लार "इश्‍यूज इन आउटवर्ड सप्लाय' यावर मार्गदर्शन करतील. तिसऱ्या सत्रात मंदार तेलंग मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेला देशभरातून चारशे चार्टर्ड अकाउंटंट व मान्यवर उपस्थित राहतील.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com