कसारा घाटातून दुहेरी वाहतूक सुरू न केल्यास टोलनाके बंद पाडणार 

Live Photo
Live Photo

नाशिक ः मुंबई- आग्रा महामार्गावर खड्डेच खड्डे झाले आहेत. तसेच कसारा घाटातून एकेरी वाहतूक केल्याने अपघात वाढलेत. त्यातून मृत्यू होतात. त्यामुळे आठवडाभरात खड्डे बुजवून कसारा घाटातून दुहेरी वाहतूक सुरू करावी अन्यथा महामार्गावरील टोलनाके बंद पाडण्यात येतील, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे देण्यात आला. पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्पाधिकारी एम. के. अत्तरदे यांनी यासंबंधीचे निवेदन दिले. 
महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनांची रखडपट्टी सुरू आहे. कसारा घाटात खचलेल्या मार्गाची अद्याप दुरुस्ती न झाल्याने दुसऱ्या मार्गावर कोंडीतून मार्ग काढताना वाहनधारकांची दमछाक होते. मात्र तरीही टोलवसुली सुरू आहे. टोलकडे प्राधान्याने लक्ष दिले जाते, तितके प्राधान्य रस्ते दुरुस्तीला मिळाले नसल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कसारा घाटात मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या रस्त्याचा काही भाग खचला असून, लांबलचक भेग पडली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करत नवीन मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली. परिणामी, प्रवासासाठी दुप्पटीपेक्षा अधिक वेळ लागतो, असे श्री. ठाकरे यांनी म्हटले. 
महामार्ग दुरुस्तीचे काम दोन दिवसांत प्रगतिपथावर असेल, असे आश्‍वासन श्री. अत्तरदे यांनी दिल्याची माहिती श्री. ठाकरे यांनी दिली. त्यांच्यासमवेत दत्ता पाटील, संजय खैरनार, किशोर शिरसाठ, योगेश दिवे, रवी गायधनी, सुनील अहिरे, दादा कापडणीस, दीपक शिंदे, मुजाहिद शेख, नदीम शेख, इम्रान पठाण, बाबा डोंगरे आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com