नाशिकमध्ये 24 ऑगस्टला जिल्हा किशोर-किशोरी खो-खो स्पर्धा 

Logo
Logo

नाशिक ः नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशन व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे 24 ऑगस्टला येथील जिल्हा परिषद छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये किशोर व किशोरी गटाच्या जिल्हा खो-खो स्पर्धा होतील. त्यातून राज्य स्पर्धेसाठी जिल्ह्याच्या संघाची निवड करण्यात येणार आहे. 
स्पर्धेचे उद्‌घाटन शनिवारी (ता. 24) सकाळी नऊला होईल. स्पर्धेसाठी खेळाडूंची वयोमर्यादा चौदा वर्षाच्या आतील म्हणजेच, 10 ऑक्‍टोंबर 2005 नंतर जन्म झालेले अशी असेल. मूल्यांकनाच्या पद्धतीत वय, वजन (किलोग्रॅम) आणि उंची (सेंटीमीटर) याची बेरीज 215 इतकी अपेक्षित असेल. स्पर्धेत पहिल्यांदा साखळी आणि नंतर बाद पद्धतीने सामने होतील. स्पर्धेत पहिल्यांदा सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी सोबत जन्माचा मूळ दाखला व त्याची सत्यप्रत आणणे आवश्‍यक असेल. त्याखेरीज स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. प्रत्येक संघाला प्रवेश, संलग्नता आणि खेळाडू नोंदणी शुल्क आकारले जाणार आहे. 
किशोर-किशोरी या दोन्ही गटात प्रत्येकी पाच संघ सहभागी झाल्यास स्पर्धेतून संघाची निवड होईल. अन्यथा निवड चाचणीद्वारे प्राथमिक संघ निवडण्यात येईल. सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघास प्रमाणपत्र देण्यात येईल. जिल्हा खो-खो संघटनेशी संलग्न असलेल्या संस्थांना निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होणे बंधनकारक आहे. 

22 ऑगस्टपर्यंत मुदत 
स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतीम मुदत गुरुवारपर्यंत (ता. 22) असेल. स्पर्धेत अधिक संघांनी सहभागी व्हावे असे जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष रमेश भोसले, सरचिटणीस मंदार देशमुख यांनी सांगितले. प्रवेशासाठी दत्तात्रय गुंजाळ (9404185344), उमेश आटवणे (9226458282), कांतीलाल महाले (7585853943), रवींद्र नाकील (9623693242) यांच्याशी संपर्क साधता येईल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com