पालिकेच्या अंगणवाड्यांना गळती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

नाशिक- आर्थिकदृष्ट्या कमकुवतं असलेल्या कुटूंबियांच्या मुलांसाठी महापालिकेच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या अंगणवाड्यांना यंदाच्या पावसाळ्यात गळती लागली असून ईमारतींच्या स्लॅब मधून पाणी टपकतं असल्याने पालकांनी मुलांना अंगणवाड्यांमध्ये पाठविणे बंद केले आहे. महिला व बालकल्याण समितीच्या सभेत अंगणवाड्यांचा अहवाल मागविण्यात आला परंतू बांधकाम विभागाकडून माहिती मिळाली नाही त्यामुळे पुढील सभेत अहवाल सादर करण्याबरोबरचं तत्काळ दुरुस्तीच्या सुचना सभापती हेमलता कांडेकर यांनी दिल्या.

समितीची पहिली सभा आज पार पडली. शहरात महापालिकेच्या वतीने 126 अंगणवाड्या चालविल्या जातात. या अंगणवाड्यांमध्ये सुमारे दहा हजार विद्यार्थी शिकतात. अंगणवाड्यांना पोषक आहार पुरविण्या व्यतिरिक्त अन्य समस्यांना सामोरे जावे लागते त्यात सातपूर व सिडको भागातील अंगणवाड्यांची दुरावस्था झाली असून स्लॅब व भिंतींमधून पाणी येत असल्याने विद्यार्थी अंगणवाडी बसतं नसल्याची तक्रारी समिना मेमन यांनी केली. त्यानुसार तत्काळ अहवाल सादर करण्याच्या सुचना सभापतींनी दिल्या. पिंक रिक्षा प्रशिक्षण देण्यासाठी प्रभाग निहाय किमान दहा महिलांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिक्षण मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय गणवेश दिले जातात त्याच धर्तीवर अंगणवाडी विद्यार्थ्यांना देखील गणवेश पुरविण्याच्या सुचना दिल्या. उपसभापती डॉ. सिमा ताजणे, सिमा निगळ, मिरा हांडगे, इंदुबाई नागरे सदस्य उपस्थित होते. महापालिकेच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या महिलांसाठी ग्रीन जीम बसविण्याच्या नऊ विषयांना मंजुरी देण्यात आली. इतर विषयांमध्ये

सीलबंद ईमारतीत अंगणवाडी
खासगी जागेत चालविल्या जाणाऱ्या अंगणवाड्या महापालिकेच्या ईमारतीत सुरु करण्याचे आदेश आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. परंतू मिळकती सील करण्यात आल्याने आयुक्तांचा आदेश कसा पाळायचा असा प्रश्‍न निर्माण झाल्याने एकतर आयुक्तांनी आदेश मागे घ्यावा किंवा अंगणवाड्यांसाठी मिळकतींचे सील खुले करण्याची मागणी सभेत करण्यात आली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakal news montesary