महापालिकेत उद्यान निरीक्षकांची मानधनावर भरती 

residentional photo
residentional photo

नाशिक ः उद्यानांचे शहर म्हणून नावलौकिक असला तरी सध्या उद्यानांची अवस्था बघता या नावलौकिकाला तडा जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याला कारण म्हणजे महापालिकेत उद्यान विभाग कार्यरत असला तरी उद्यान निरीक्षक नसल्याचा हा परिणाम असून, त्यामुळे उद्यान निरीक्षकांच्या पाच रिक्त पदांची भरती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मानधनावर ही नियुक्ती होणार आहे. 17 नोव्हेंबरपर्यंत इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

शहरात छोटी-मोठी मिळून 488 उद्याने आहेत. पण यातील अगदी बोटावर मोजण्याइतकी उद्याने सुस्थितीत आहेत. उद्यानांमधील तुटलेली खेळणी, झाडांना पाणी मिळत नसल्याने ते सुकण्याचे प्रमाण, वाढलेले गाजरगवत, उद्यानांच्या परिसरातील अतिक्रमण या बाबी उद्यानांच्या दुरवस्थेला कारणीभूत ठरल्या आहेत. उद्यान निरीक्षक नसल्याने उद्यान विभाग कार्यरत असूनही नियंत्रण नसल्याने प्रशासनाकडून रिक्त पदे भरली जाणार आहेत.

सध्या एकूण उद्यानांपैकी 276 उद्याने खासगीकरणातून देखभाल- दुरुस्तीसाठी देण्यात आली आहेत. उर्वरित उद्यानांवर देखभाल करण्यासाठी सहापैकी पाच रिक्त निरीक्षक पदे मानधनावर नियुक्त केली जाणार आहेत. उद्यान निरीक्षक पदासाठी महापालिकेने संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध केली असून, यात 17 नोव्हेंबर 2018 पर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत महापालिका मुख्यालयातील उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागात इच्छुकांकडून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 22 नोव्हेंबरला सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com