सिन्नरभूषण सूर्यभान गडाखांचे निधन 

residential photo
residential photo

नाशिक ः सिन्नरचे माजी आमदार सूर्यभान गडाख (वय 92) यांचे आज रात्री निधन झाले. सिन्नरच्या औद्योगिक विकासाची मुहूर्तमेढ त्यांनी मुसळगाव सहकारी औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून रोवली. तसेच त्यांनी शिक्षणाची सुविधा व्हावी म्हणून माध्यमिक लोकशिक्षण मंडळाची स्थापना केली. त्यांना 1994-95 मध्ये औद्योगिक वसाहतीचा यशस्वी संस्थापक, 1997-98 मध्ये सिन्नर भूषण आणि 2016-17 मध्ये जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. संयुक्त महाराष्ट्रच्या लढ्यात त्यांचा सहभाग होता. तसेच 1952 मध्ये भूमीहिनांना सरकारने जमीन द्यावी यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्यासमवेत मोढे आंदोलन उभे केले होते. त्यांनी 1962, 1967, 1972 मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या. पंधरा वर्षे त्यांनी सभापती म्हणून काम पाहिले. भोजापूर धरणाचे पाणी तालुक्‍याला मिळावे म्हणून आंदोलन केले होते. सिन्नर तालुक्‍यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती त्यांनी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गाधी, राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांच्यापर्यंत पोचवली होती. पुढे तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांनी पांगरी गावात आणले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com