पिंप्रीमध्ये हिंदू-मुस्लीम ऐक्‍याचा संदेश देणारा संदल 

आनंद बोरा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

नाशिक ः कादवा नदीच्या तीरावरील साडेतीन हजार लोकसंख्येचे पिंप्री गाव. हिंदू-मुस्लीम ऐक्‍याचा संदेश देणारा संदल हे गावाचे वैशिष्ट्य असून दोनशे वर्षांची शंभराहून अधिक चिंचेच्या झाडांचे बन गावात आहे. ग्रामदेवता महालक्ष्मी, हनुमान, शनी महाराज, खंडेराव, दक्षिणमुखी हनुमान, रेणुकामाता, म्हसोबा, साई अशा मंदिरांनी धार्मिकतेला उजाळा दिला जात आहे. 

गावातील पौराणिक माहात्म्याचे महादेव मंदिर असून मंदिरातील शिवलिंग पूरातन असल्याचे ग्रामस्थ सांगतात. गावात महालक्ष्मी यात्रा भरते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव धुमधडाक्‍यात साजरा केला जातो. कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज गवळी हे पंचक्रोशित ओळखले जातात. इथल्या मल्लांनी कुस्तीमध्ये गावाला नाव मिळवून दिले. सागर आहेर हा तरुण देशसेवेसाठी सैन्य दलात दाखल झाला आहे. सैन्यदलाकडून देशाचे प्रतिनिधित्व त्याने कुस्तीमध्ये केले आहे. गणेश आहेर या तरुणाची आफ्रिकेसाठी निवड झाली. भागवत नन्हे कुस्तीमध्ये राष्ट्रीयस्तरावरील कामगिरी करत आहे. भजनी मंडळ, स्वाध्याय केंद्र, व्यायाम शाळा, महिला बचतगट हेही गावाचे वैशिष्ट्य आहे. पण गावात पशुवैद्यकीय दवाखाना नसल्याने शेतकऱ्यांना पशुधनाच्या अनुषंगाने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. 

गावात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम साजरे होतात. गावात सरकारी दवाखाना नाही. त्यामुळे रुग्णांना जवळच्या गावात नेऊन खासगी डॉक्‍टरांकडून उपचार करून घ्यावे लागतात. पशुधनाप्रमाणेच ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी गावात सरकारी सुविधा उपलब्ध व्हावी.
- दिलीप आहेर (शेतकरी) 

आमच्या गावात शेती हा प्रमुख व्यवसाय असल्याने गावातील रस्ते दुरुस्त होणे आवश्‍यक आहे. शिवार रस्त्यांची कामे व्हायला हवीत. शेतीविषयक कार्यशाळा उपक्रम राबवत अद्ययावत शेतीचे ज्ञान होणे शेतकऱ्यांपर्यंत पोचायला हवे.
- प्रवीण आहेर (शेतकरी) 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News NMRDA