लोकनाट्य कलाकारांचे गाव आहेरगाव 

Live Photo
Live Photo

नाशिक :  नेत्रावती नदीच्या तीरावर वसलेले आहेरगाव. चार हजाराच्या आसपास लोकवस्तीचा गाव. लोकनाट्य कलाकारांचे गाव म्हणून ओळखले जाते. (कै) किशोरराव बागूल आणि त्यांच्या कुटुंबियांनी सुरु केलेले लोकनाट्य परंपरा दोनशे वर्षांची आहे. जिल्ह्यातील जूने लोकनाट्य मंडळ गावात अखंड सेवा देत आहे. पाच कलावंतांचा चमू जिल्ह्यात कलेचे प्रदर्शन घडवत असून पंचक्रोशीत हे कलावंत प्रसिद्ध आहेत. 
गावामध्ये सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले दातावली पीर सोबत महादेव, खंडेराव, गणपती मंदिर, जनार्दन स्वामी मठ आहे. गावाचे भूषण प्राचीन रोकडोमल महाराज मंदिर आहे. साडेतीनशे वर्षापूर्वी पुरात वाहून आलेली मूर्ती आणि मंदिर हे त्याचे वैशिष्ट्य. मंदिराचा यात्रोत्सव होतो. चैत्र महिन्यात गावातून रथाची मिरवणूक काढली जाते. त्यावेळी रथाला प्रत्येक घरा जवळ शेतकरी बैल बांधून रथ ओढून पुढच्या घरापर्यंत नेतात. अश्‍या पद्धतीने गावातील सर्व घरातील बैलांना रथ ओढण्याचा मान मिळतो. ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली आहे. तसेच बारा गाड्या ओढण्याची परंपरा इथे आहे. सरदार त्रंबकजी डेंगळे यांची सासरवाडी गावातील असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यांची पत्नी इथे राहत होती आणि तिचे समाधी स्थान गावात आहे. 

झेप कादंबरीत उल्लेख 
"झेप' कादंबरीमध्ये गावाचा उल्लेख आढळतो. पूर्वी गावाला कोट होता. त्याची आता अवस्था बिकट झाली आहे. गावात जहागिरदार वाडा होता. एक बारव आहे. तिची अवस्था बिकट झाली आहे. तसेच एक राजवाडा व दोन आदिवासी वाडे गावात आहेत. अठरा पगडजातीचे गाव गाव असून बारा बलुतेदार गावात राहतात. गावाला दोन वेशी आहेत. महिला भजनी मंडळ, खंडोबाचे गोंधळ घालणारे वाघे, भारुडकार, पाच कीर्तनकार अशा वैविधतेने गाव नटलेला आहे. 

गावात चोरी झाला नाही. दरोडा पडला नाही. वारकरी संप्रदायाची परंपरा पुढे आम्ही चालवत आहोत. गावातील कलावंतांना व्यासपीठ मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत
- ह. भ. प. भास्कर महाराज रसाळ 

सरदार त्रंबकजी डेंगळे यांच्या पत्नीचे निधन गावात झाल्याचे आमचे पूर्वज सांगत आलेत. या इतिहासाचा अभ्यास होणे आवश्‍यक असून त्यातून इतिहास समोर येण्यास मदत होईल.
- नंदकिशोर पवार (ग्रामस्थ) 

आमचे गाव लोकनाट्य कलावंतांचे गाव म्हणून ओळखले जाते. सनई वादन करणारे आमचे कलावंत जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. दोनशे वर्षापासूनची ही परंपरा आम्ही जोपासली आहे. -

-शांताराम निकम (कलाकार) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com