पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुरुवारच्या  सभेसाठी सभामंडपाचे काम प्रगतीत 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

नाशिक ः पंचवटीमधील तपोवनातील साधुग्राममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरुवारी (ता. 19) होणाऱ्या सभेच्या स्थळावरील व्यासपीठ आणि सभामंडपाचे काम वेगाने सुरू आहे. या तयारीचा आढावा आज स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली. तसेच आवश्‍यकतेनुसार बदलाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

नाशिक ः पंचवटीमधील तपोवनातील साधुग्राममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरुवारी (ता. 19) होणाऱ्या सभेच्या स्थळावरील व्यासपीठ आणि सभामंडपाचे काम वेगाने सुरू आहे. या तयारीचा आढावा आज स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली. तसेच आवश्‍यकतेनुसार बदलाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 
प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगूरकर, स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, हिमगौरी आडके, शरद मोरे, रुची कुंभारकर, सुरेश खेताडे, शिवाजी गांगुर्डे, अविनाश पाटील, श्‍याम पिंपरकर, सुनील फरताळे, धनंजय पुजारी, दामोदर मानकर, सचिन ठाकरे, सुरेशअण्णा पाटील आदींनी तयारीचा आढावा घेतला. समन्वय, प्रमुख चौकात स्वागत, व्यासपीठ, मोटारसायकल रॅली व वाहन नियोजन, शहर सजावट या समित्यांच्या आढावा बैठकी दररोज होत आहेत. 
नाना शिलेदार, उत्तम उगले, ऍड. अजिंक्‍य साने, उपमहापौर प्रथमेश गिते, अमित घुगे, नाशिक रोड मंडलाध्यक्ष बाजीराव भागवत, द्वारका मंडलाध्यक्ष सुरेश मानकर, पंचवटी मंडलाध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, मध्य- पश्‍चिम मंडलाध्यक्ष देवदत्त जोशी, सिडको मंडलाध्यक्ष बाळासाहेब पाटील, सातपूर मंडलाध्यक्ष शशिकांत जाधव यांचा महाजनादेश यात्रा समारोप तयारीत सहभाग आहे. याशिवाय प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, सुनील बागूल, ज्येष्ठ नेते विजय साने, आमदार बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे यांनी तयारीला वेग दिला आहे. सोशल मीडियाचे प्रदेश संयोजक प्रवीण अलई, योगेश चौधरी व त्यांचे सहकारी जनजागृतीवर भर देत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Politics