#Vidhansabha2019 शरद पवार यांच्या गुरुवारी नाशिक शहर-जिल्ह्यात 5 सभा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

नाशिक ः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या गुरुवारी (ता. 17) ऑक्‍टोबर) शहर आणि जिल्ह्यात सभा होतील. या सभा कांद्याच्या पट्यात होत असल्याने कांद्याच्या मुद्याला राष्ट्रवादीकडून तोफ डागली जाणार असे दिसते. 

श्री. पवार यांची सकाळी दहाला सटाणा येथे बागलाणच्या उमेदवार दीपिका चव्हाण यांच्या प्रचारासाठी सभा होईल. त्यानंतर दुपारी साडेबाराला निफाड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप बनकर यांच्या प्रचारासाठी पिंपळगाव बसवंत येथे, तर दुपारी तीनला नांदगावचे उमेदवार पंकज भुजबळ यांच्या प्रचारासाठी नांदगाव येथे सभा होणार आहे. देवळाली मतदारसंघातील उमेदवार सरोज अहिरे व नाशिक पूर्वचे उमेदवार बाळासाहेब सानप यांच्या प्रचारासाठी सायंकाळी पाचला पंचवटीतील मखमलाबादमध्ये सभा होणार आहे. नाशिक पश्‍चिम मतदारसंघातील उमेदवार डॉ.अपूर्व हिरे यांच्या प्रचारासाठी सायंकाळी सातला सिडकोतील पवननगरमध्ये सभा होणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Politics