डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त  डॉ. कुटेंचे शुक्रवारी नाशिकमध्ये व्याख्यान 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

नाशिक ः "सकाळ'चे संस्थापक संपादक (कै.) डॉ. ना. भि. ऊर्फ नानासाहेब परुळकेर यांच्या 122 व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (ता. 20) सकाळी साडेदहाला कर्मवीर काकासाहेब वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुनील कुटे यांचे व्याख्यान होईल. गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहासमोरील आय. एम. आर. टी. महाविद्यालयाच्या सभागृहात होणाऱ्या व्याख्यानासाठी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. 

डॉ. कुटे हे "वॉटर करन्सी' या विषयावर उपस्थितांशी संवाद साधतील. माणसाच्या जीवनामध्ये पाण्याचे मूल्य मोठे आहे. निर्मितीच्या मूल्याचा विचार होतो पण त्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा विचार होत नाही. नेमकी याचसंबंधीची जागृती व्हावी म्हणून अभियांत्रिकी, कृषी, उद्योग, व्यवस्थापन व सामाजिक क्षेत्रातील अभ्यासक, विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

डॉ. सुनील कुटेंचा परिचय 
अध्यापन, संशोधन, प्रशासकीय व सल्लागार क्षेत्राचा 27 वर्षांचा अनुभव आहे. कॉंक्रीट टेक्‍नॉलॉजी व धरण अभियांत्रिकी हे त्यांच्या अध्यापनाचे व संशोधनाचे विषय आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा विद्यार्थ्यांनी पी. एचडी. ही अभियांत्रिकीमधील सर्वोच्च पदवी संपादन केली. केंद्र सरकारच्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे महाराष्ट्राचे ते गुणवत्ता निरीक्षक आहेत. त्यातंर्गत त्यांनी आतापर्यंत दोन हजार किलोमीटर रस्त्यांची तपासणी केली. त्यांचे 102 शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी सत्र अध्यक्षपद भूषवले आहे. त्यांच्या संशोधनाला दोन पेटंटस्‌ मिळाले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे त्यांना सर्वोत्कृष्ट प्राध्यापक आणि उत्कृष्ट सृजनात्मक व नाविन्यपूर्ण शिक्षण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इंग्लंड व भारताच्या आंतरराष्ट्रीय कॉंक्रीट कॉंग्रेसमध्ये त्यांच्या शोधनिबंधाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला. त्यांनी 13 विविध पुरस्कार मिळालेत. "डॅम्स अँड हायड्रॉलिक स्ट्रक्‍चर्स' या विषयावरील त्यांचे पुस्तक ऑक्‍सफर्ड विद्यापीठातर्फे प्रकाशित करण्यात आले आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Speech