द्राक्ष निर्यातीदारांचे गाव दावचवाडी 

residential photo
residential photo

नाशिक ः मनकरणी नदीच्या तीरावर वसलेले तीन हजार लोकवस्तीचे दावचवाडी. द्राक्ष निर्यातदारांचे गाव म्हणून ओळख निर्माण केलीय इथल्या शेतकऱ्यांनी. थॉमसन सीडलेस वाणाच्या द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. खंडेराव महाराजांची वांगेसट पौर्णिमेचा यात्रोत्सव हे गावाचे आणखी एक वैशिष्ट्य. गावातील खराब रस्त्यांनी ग्रामस्थांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. 
गावात हनुमान, खंडेराव, जगदंब, शंकराचे मंदिर आहे. तीनशे वर्षापूर्वीचे शंकराचे मंदिर आहे. त्याला आधुनिक साज चढवल्याने मंदिराचे हेमांडपंथी रूप हरवून गेले. जून्या मारुती मंदिरातील सुंदर लाकडी काम हनुमानभक्तांना खिळवून ठेवते. गावात रंगनाथ महाराज कोकाटे यांच्या प्रेरणेने सप्ताह सुरु झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. सैन्यदलामध्ये कर्नल म्हणून सुधाकर पाटील देशसेवा बजावत आहेत. याखेरीज पंधरा तरुण सैन्यदलात दाखल झाले आहेत. याशिवाय भजनी मंडळातर्फे विविध उपक्रमांची रेलचेल असते. शिवजयंतीचा उत्सव धुमधडाख्यात साजरा होतो. 
विविध वाद्य वाजविणारे अनेक कलावंतांची मांदियाळी असून विविध ठिकाणी ते कार्यक्रमात सहभागी होत आपल्या कलांचे सादरीकरण करतात. गावात अनेक माड्या आहेत. ग्रामस्थ एकत्र येऊन गणपती, नवरात्रोत्सव साजरा करतात. मात्र व्यायामशाळा नसल्याने अनेक तरुण निफाड येथे व्यायाम करण्यासाठी जातात. ही गैरसोय दूर होण्यासाठी गावात व्यायामशाळेची उभारणी करावी, अशी मागणी इथल्या तरुणांची आहे. मनकरणी नदी पावसाळ्यात वाहते अन्‌ उन्हाळ्यात तिचे पात्र कोरडेठाक पडलेले असते. 

शेतकऱ्यांचे मुख्य पीक द्राक्ष असल्याने त्याविषयीची शास्त्रीय माहिती मिळण्यासाठी गावात कार्यशाळा व्हायला हव्यात. माती परीक्षण, कीड आणि पाणी व्यवस्थापनाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचायला हवी.
-विवेक कुयटे (ग्रामस्थ) 

आमच्या गावातील मंदिरांचा जीर्णोद्धार होऊ लागला आहे. सभामंडप उभारण्यात आले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम होतात. शिक्षणासाठी शहरात गेलेली मुले सण साजरा करण्यासाठी गावात येतात. त्यांच्यामुळे आनंद द्विगुणीत होतो.'' 
-सुभाष कुयटे (ज्येष्ठ नागरिक) 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com