वाजंत्री कलावंतांचे गाव "आगासखिंड' 

आनंद बोरा ः सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

नाशिक ः आगासखिंड (ता. सिन्नर) हे गाव छोटे असले तरीही किर्तीने ते पंचक्रोशित प्रसिद्ध आहे. एकविसशेपर्यंत लोकवस्ती असलेले हे गाव वाजंत्री कलावंतांचे म्हणून ओळखले जाते. आईकाशी मातेचा यात्रोत्सव गुढीपाडव्याला भरतो. तसेच मारुती आणि भैरोबा यात्रोत्सव होतो. यात्रोत्सवात होणारी कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी जिल्हाभरातून कुस्ती रसिक येतात. याच गावातील शाळा आणि बालवाडी डिजीटल आहे. 

गावात हनुमान, आई काशीमाता, भैरवनाथ मंदिर आहे. दारणा नदीच्या उत्तरेला असलेल्या गावात भजनी मंडळ आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव धुमधडाक्‍यात साजरा केला जातो. सनई वादक गावाचे वैशिष्ट्य आहेत. मुख्यमंत्री पेयजल योजना गावासाठी मंजूर झाली आहे. गावात दलित, भिल्ल आणि वाघवाडी वस्ती आहे. गावाजवळच्या डोंगराच्या खिंडीवरून गावास आगसखिंड नाव मिळाल्याचे ग्रामस्थ सांगतात. गावात हरिनाम सप्ताह होतो. 

गावातील हनुमान मंदिर आकर्षित आहे. बालवाडीतून कुपोषित बालकांना मोफत आहार दिला जातो. 
- लहानू बरकले (सरपंच) 

वयाच्या बाराव्या वर्षापासून मी सनई वादन करतो. स्वरावर नियंत्रण ठेवणारी कला आम्ही सांभाळली असून आम्ही पारंपारिक वाद्य वादनाचा आनंद घेतो. आमची पुढची पिढी या क्षेत्रात आहे. कलावंतांना मदत मिळणे आवश्‍यक आहे. संगीत, वाद्य वादन कलेला प्रोत्साहन देणे आवश्‍यक आहे. 
- गोपीनाथ जगताप (सनई वादक) 

विद्यार्थ्यांना अध्यापन करताना गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षण घेता यावे यावर विशेष लक्ष दिले जाते. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षक दरवर्षी स्वखर्चाने शालेय साहित्य उपलब्ध करुन देतो. त्यातून आम्हाला आनंद अधिक मिळतो. 
- श्रीराम इलग (शिक्षक) 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Village