देशसेवेसाठी निमगावच्या दीडशे तरुणांच्या फौज सैन्यदलात 

आनंद बोरा ः सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

नाशिक ः हळकुंडी नदीच्या तीरावरील निमगाव (ता. सिन्नर). पाच हजाराच्या आसपास लोकवस्ती असलेल्या या गावातील दीडशे तरुणांची फौज सैन्यदलात दाखल होऊन देशसेवेत आहे. एका वाड्यातून दोन तरुणांचा त्यात समावेश आहे. गावात बुद्ध पौर्णिमेला रोकडेश्‍वर यात्रोत्सव होतो आणि रथोत्सव साजरा केला जातो. रथाला जुंपण्याचा मान गावातील प्रत्येक बैलाला मिळतो. तसेच गावात जानेवारीमध्ये शनिश्‍वराची यात्रा भरते. त्यावेळी कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींची मोठी गर्दी होते. 

ताराबाई घुगे या गावच्या पोलिस पाटील आहेत. त्यांनी परीक्षेतून हे यश मिळवले आहे. गावात विठ्ठल, शनी, राम, सप्तशृंगी, खंडेराव, रेणुका आणि रोकडेश्‍वर ही मंदिरे आहेत. वाळीबा सानप यांचे भारुड पंचक्रोशित प्रसिद्ध आहे. कीर्तनकार चिंतामण महाराज सानप हे वारकरी संप्रदाचा वारसा पुढे नेताहेत. सिन्नर तालुका भूषण म्हणून त्यांचा गौरव झाला आहे. मृदुंगाचार्य मयूर महाराज पांडे आणि सागर सानप यांनी आपली ओळख जिल्हाभर तयार केली आहे. गावात वीस कलावंत आहेत. गावात काशीआईच्या जत्रेत पाचव्या मोड्याचा कार्यक्रम होतो. यावेळी कलावंत आपली कला सादर करतात. गावातून कावडीची मिरवणूक काढली जाते. चंपाषष्टीला बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम शंभर वर्षांपासून अखंडपणे सुरु आहे. गाड्या ओढण्याचा मान प्रल्हाद सानप यांना आहे. गावात बाल भजनी मंडळ आहे. हरिनाम सप्ताहचे आयोजन केले जाते. जूनी तालीम गावाचे वैभव आहे. कडुलिंबाची शेकडो झाडे असल्याने निमगाव अशी ओळख गावाला मिळाल्याचे ग्रामस्थ सांगतात. 

गावात वीसहून अधिक कलावंत आहेत. खंजिरी, तुणतुणे, टाळ, ढोलकी, संबळ आदी वाद्यांचे वादन करतात. वादनामध्ये रस असलेल्या आताच्या पिढीला व्यासपीठ मिळाल्यास सारे जण याच क्षेत्रात करिअर करु शकतील.

- विशाल सानप (वादक)  

वारकरी संप्रदायाची परंपरा वृद्धींगत व्हावी म्हणून प्रयत्न सुरु आहेत. गावागावांमधून माझे कीर्तन होतात. गेल्या पंधरा वर्षांपासून मी कीर्तन करत आहे. नवीन पिढीला आध्यत्मिक मार्ग गवसावा म्हणून माझे प्रयत्न आहेत.
-चिंतामण महाराज सानप (कीर्तनकार)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Village