चंद्रपूर (घोडेवाडी) करांचे मजुरी हेच उदरर्निवाहाचे साधन 

आनंद बोरा ः सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

नाशिक ः आदिवासी बहोल चंद्रपूर (घोडेवाडी) गावाची लोकसंख्या सहाशेच्या आसपास. सिन्नर तालुक्‍यातील मजुरांचे गाव ही ओळख पुसता न आल्याचे शल्य ग्रामस्थांमध्ये आहे. ज्येष्ठ कलावंतांनी संस्कृतीचे जतन केलेयं. मागील महिन्यात व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधताना सरपंच सुनिता मदगे यांनी बंधाऱ्याचा मुद्दा मांडला होता. पण अद्याप बंधाऱ्याची मोजणी झाली नसल्याची खंत सरपंचांची आहे. 

गावात मारुती, देवी, अंबाबाई, गणपती अशी मंदिरे आहेत. हनुमान मंदिराचे काम दोन वर्षांपासून बंद असून ते लवकर पूर्ण व्हावे, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. गावात आदिवासीदिन मोठ्या उत्साहात साजरी केला जातो. भजनी मंडळ हे गावाचे वैशिष्ट्य आहे. गावातील प्राथमिक शाळेची अवस्था बिकट आहे. ही शाळा धोकादायक बनली असून ती कोसळण्याची भीती ग्रामस्थांना वाटते. इथे एका खोलीत चार वर्ग भरतात. गावात दवाखाना नाही. गावाच्या विहिरीतून गावाला पाणीपुरवठा होतो. विहिरीचे पाणी गावाबाहेरच्या टाकीत टाकून मग ते घरात पोचवले जाते. उन्हाळ्यात पाण्याची समस्या जाणवते. 
गायक आणि वादक कलावंत हे गावाचे वैभव आहेत. म्हाळू घोडे हे ढोल वाजवतात. बिजाबाई मदगे, सुमन गवारे, चंद्रकला मदगे, सत्यभामामती मदगे, जनाबाई भांगरे, जनाबाई सायुक्ते या भजन, गवळण, अभंग आणि देवीची गाणी म्हणतात. ग्रामस्थांनी रुख्मिणी शेकरे हा सुनेला लता मंगेशकर अशी पदवी बहाल केली आहे. रुख्मिणीताईंचा आवाज खूप सुंदर असून त्या गायनासाठी जातात. गावातील व्यसनाबद्दल महिला चिंतातूर आहेत. व्यसन सोडवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशी अनेकींची मागणी आहे. गावात घरकुल योजनेचे काम सुरु आहे. 

आमच्या गावात अनेक समस्या आहेत. गावातील रस्ते आम्हाला दुरुस्त करायचे आहेत. गावासाठी नवीन पाणीपुरवठा योजना घ्यायची आहे. त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. 
- सुनिता मदगे (सरपंच) 
 
गावात वाचनालय नाही. माध्यमिक शाळा नाही. तरुणांना स्पर्धा परीक्षांमध्ये करिअर करायचे आहे. आम्हाला शिकायचे असून गावाचे नाव मोठे करायचे आहे. त्यासाठी मार्गदर्शन व्हावे.
- गणेश बुळे (विद्यार्थी) 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Village