एकतारी भजन आणि कलगीतुरासाठी प्रसिद्ध रवळगाव 

Live Photo
Live Photo

नाशिक ः आळंदी धरणाजवळ वसलेले रवळगाव (ता. दिंडोरी). तीन हजार लोकसंख्येच्या गावाच्या पूर्वेला पाणवता अन्‌ पश्‍चिमेला आळंदी नदी वाहते. हे गाव एकतारी भजन आणि कलगीतुरासाठी प्रसिद्ध आहे. गावाच्या शिवारातील चिरांचे गूढ उलगडलेले नाही. लाकडी आणि दगडी चिरा अभ्यासण्यातून गावाचा इतिहास पुढे येण्यास मदत होईल. पूर्वी गावात मल्लखांब खेळला जायचा. 
ग्रामपंचायत दोन वाड्या मिळून आहे. गावात मारुती, गणपती, महादेव, मरीआईचे मंदिर आहे. गुरु पौर्णिमेला गावात यात्रोत्सव होतो. कलावंतांचे गाव म्हणून रवळगाव ओळखले जाते. पोपट लहू भोये हे कीर्तनकार गावचे. लक्ष्मण टोगाटे, फकीरा भोये, नामदेव भोये, हरी शितन हे भजन म्हणतात. गावाजवळील महादेव मंदिरात संगीताचे सूर ऐकायला मिळतात. कलाकारा इथे रियाज करतात. शिवमंदिरातील देवराम गोतारणे बाबांचे एकतारी भजन जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. लक्ष्मण टोंगारे, पिंटू टोंगारे त्यांना साथसंगीत करतात. बलन भोये, बाळू शितन, दत्तू लीलके, चंदर टोंगारे हे मल्ल प्रसिद्ध होते. गावात व्यायामशाळा नाही. त्यामुळे तरुणाई कुस्तीपासून दूरावत असल्याची वेदना ग्रामस्थांमध्ये आहे. 
गावात आठवीपर्यंत शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शेजारील गावात पायपीट करावी लागते. गोरखनाथ बाबा यांची समाधी गावात आहे. लहरीनाथ बाबा गावात वास्तव्यास असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आदिवासी बहोल गावातील अशोक बेंडकुले यांनी चित्रकलेत करिअर करण्याचे ठरवले. यंदा पुराचा फटका बसला असून शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. बंदिस्त केलेले बांध फुटले. घरे कोसळलीत. पांडू लीलके हे तमाशा कलावंत याच गावचेच. 

महादेव मंदिरात मी गेली अनेक वर्षे वास्तव्याला आहे. माझ्या कुटीमध्ये रोज गायनाचा सराव होतो. मी कलगीतुरा आणि एकतारी भजन सहकाऱ्यांसोबत सादर करतो. आम्हाला जिल्हाभारातून गायनासाठी बोलावले जाते. 
- देवराम गोतारणे (गायक व वादक) 

आमच्या गावातील दगडी आणि लाकडी चिरांचा अभ्यास व्हायला हवा. वेताळबाबा हे ग्रामस्थांचे श्रद्धेचे ठिकाण आहे. गावातील तरुणाईसाठी व्यायामशाळा उभारायला हवी. तसेच अभ्यासासाठी वाचनालय व्हायला हवे. 
- वामन लीलके (ग्रामस्थ) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com