पाण्याचा वापर व्हावा जबाबदारीने : श्रीकांत नावरेकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

नाशिक ः पृथ्वीचा 71 टक्के भाग पाण्याने व्यापलेला असला, पिण्यायोग्य पाणी एक टक्का आहे. त्यामुळे पाण्याचा प्रत्येकाने जबाबदारीने करायला हवा, असे प्रतिपादन स्वच्छता तज्ज्ञ श्रीकांत नावरेकर यांनी केले. वाढती लोकसंख्या, असमान वितरण आणि नैसर्गिक स्रोतांचा ऱ्हास अशा कारणांमुळे ही जबाबदारी वाढल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. 

नाशिक ः पृथ्वीचा 71 टक्के भाग पाण्याने व्यापलेला असला, पिण्यायोग्य पाणी एक टक्का आहे. त्यामुळे पाण्याचा प्रत्येकाने जबाबदारीने करायला हवा, असे प्रतिपादन स्वच्छता तज्ज्ञ श्रीकांत नावरेकर यांनी केले. वाढती लोकसंख्या, असमान वितरण आणि नैसर्गिक स्रोतांचा ऱ्हास अशा कारणांमुळे ही जबाबदारी वाढल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. 
केंद्र सरकारच्या माहिती-प्रसारण मंत्रालयातंर्गतच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोतर्फे नाशिक रोड येथील सोमानी गार्डनमध्ये जलशक्ती प्रचार अभियानातंर्गतच्या चित्रप्रदर्शनाचे उद्‌घाटन नावरेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. क्षेत्रीय प्रचार अधिकारी पराग मांदळे, राजश्री वैशंपायन उपस्थित होते. नावरेकर म्हणाले की, मानवी संस्कृतीचा विकास सुरवातीच्या काळापासून नदीकाठी झाला आहे. मानवाने नेहमी पाण्याच्या सान्निध्यात निवास केला. पण मानवाने नद्यांना गटारीचे स्वरुप आणले आहे. पूर्वी लोकसंख्येच्या तुलनेत पाणी मुबलक असल्याने "पाण्यासारखा पैसा खर्च करणे' अशी म्हण तयार झाली. मात्र आता ही म्हण पूर्णपणे बदलली. 
इस्त्राइलने पाण्याचे जनत आणि संवर्धानात मोठी झेप घेतली. त्यांच्याकडून आपल्याला ही कला शिकायला हवी. आपण घरातील 70 टक्के पाण्याचा वापर शौचालयात करतो. हे चित्र बदलणे गरजेचे आहे. आपल्या घरातील सांडपाणीचे योग्य व्यवस्थापन काळाची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. 
पाण्याच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी केंद्र सरकारने जलशक्ती मंत्रालय स्थापन केले, असे सांगून श्री. मांदळे यांनी आपण छोट्या सवयींमध्ये बदल करून मोठ्याप्रमाणात पाण्याची बचत करू शकतो, अशी अपेक्षा मांडली. सदाशिव मलखेडकर यांनी सूत्रसंचालन केले. चंदू चडुके यांनी आभार मानले. 

आजपर्यंत प्रदर्शन खुले 
पाण्यावर आधारित प्रश्‍नोत्तर स्पर्धा घेण्यात आली. विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. कोठारी कन्या शाळेतून विद्यार्थिनींची जनजागरण फेरी काढण्यात आली. उद्यापर्यंत (ता. 11) हे चित्रप्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Water