राजमानेत 'सकाळ'तर्फे नालाखोलीकरण; 'तनिष्कां'चा पुढाकार

दीपक कच्छवा
शनिवार, 19 मे 2018

समस्या मांडण्यापासून ते सोडविण्यापर्यंत "सकाळ'चा पुढाकार 
राजमाने येथील पाणी समस्येचे वृत्त सर्वप्रथम "सकाळ'ने प्रसिद्ध केले. "विजेने पळविले राजमानेकरांचे तोंडचे पाणी', "राजमाने येथे पाच वर्षांत पाणीपुरवठा योजनेतून पाच वेळाच पाणी' या मथळ्याखाली बातम्या प्रसिद्ध केल्या. त्या "सकाळ'च्या माध्यमातून तसेच "ट्‌विटर' व "व्हाट्‌सऍप'वर "व्हायरल' झाल्या. समस्या मांडण्यापुरता "सकाळ' मर्यादीत राहिला नाही, तर ही समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानुसार, "तनिष्कां'च्या माध्यमातून आज प्रत्यक्षात नाला खोलीकरणाचे काम सुरू झाले. त्यामुळे ग्रामस्थांनी "सकाळ'चे कौतुक केले.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : "सकाळ' माध्यम समुह केवळ समस्याच मांडतो असे नाही, तर कृतिशील उपायही सूचवतो. त्या पुढचे पाऊल टाकत ज्या समस्येला वाचा फोडली, त्यावर उपाययोजना देखील "सकाळ' करतो. चाळीसगावपासून वीस किलोमीटर अंतरावरील राजमाने (ता. चाळीसगाव) येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने ते दूर करण्यासाठी "सकाळ रिलीफ फंडा'ची मोलाची साथ मिळाली आहे. "सकाळ' माध्यम समूहाच्या तनिष्का गटाच्या माध्यमातून आज गावात नाला खोलीकरणाच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. 

राजमाने (ता. चाळीसगाव) गावात पाण्याची समस्या अतिशय गंभीर बनली आहे. ही समस्या दूर करण्याचा "सकाळ'च्या "तनिष्कां'नी निर्धार केल्यानंतर आज नाला खोलीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. "सकाळ'च्या खानदेश आवृत्तीचे संपादक विजय बुवा, संगणक अभियंता गुणवंत सोनवणे, "तनिष्का'चे व्यवस्थापक अमोल भट याप्रसंगी उपस्थित होते. 

श्री. बुवा यांनी "सकाळ रिलीफ फंडा'च्या माध्यमातून महाराष्ट्रात ठिकठिकाणी केलेल्या व होत असलेल्या कामांची माहिती दिली. अमोल भट यांनी नाला खोलीकरणाचे हे काम आपल्या घरचे काम आहे, असे समजून प्रत्येकाने सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या शंकांचे श्री. बुवा यांनी निरसन केले. श्री सोनवणे यांनी पारदर्शकपणे तसेच सर्वांना सोबत घेऊन गावाच्या विकासाची कामे केली जातील असे सांगितले. सामाजिक दातृत्वाच्या भावनेतून "सकाळ' समूह राबवीत असलेल्या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी कौतुक केले. 

खोलीकरणाच्या शुभारंभप्रसंगी सरपंच कविता पाटील यांच्यासह "तनिष्कां'च्याहस्ते "जेसीबी'चे पूजन करून नारळ वाढवून प्रारंभ केला. तनिष्का गटाच्या सदस्या मोनिका सोनवणे, पूनम सोनवणे, शैला सोनवणे, उषाबाई सोनवणे, उन्नती पाटील, प्रमिला बोरसे, मनीषा पाटील, शोभाबाई पाटील, निर्मला पाटील, हेमलता निकम, मंगलबाई पाटील, अनिता पाटील, अनिता पाटील, राजश्री शिंपी, सुशीलाबाई सोनवणे, योगिता निकम, मंगल बागूल, सुरेखा पटाईत, प्रतिभा बागूल, लताबाई निकम, रंजना केदार यांच्यासह तुषार पाटील, श्री. बोरसे, दयाराम सोनवणे, आबा सोनवणे, भय्यासाहेब पाटील, गोटू सोनवणे, डॉ. योगेश पाटील, राजकुमार निकम, शिवराम निकम, अरविंद निकम, वाल्मीक केदार, साहेबराव पाटील, सुभाष ढगे, आर. बी.पाटील, रामचंद्र सोनवणे, रमेश पाटील, शैलेंद्र निकम आदी उपस्थित होते. या कामाला अधिक बळकटी येण्यासाठी शेतकऱ्यांनी लोकसहभागातून आणखीन सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. 

समस्या मांडण्यापासून ते सोडविण्यापर्यंत "सकाळ'चा पुढाकार 
राजमाने येथील पाणी समस्येचे वृत्त सर्वप्रथम "सकाळ'ने प्रसिद्ध केले. "विजेने पळविले राजमानेकरांचे तोंडचे पाणी', "राजमाने येथे पाच वर्षांत पाणीपुरवठा योजनेतून पाच वेळाच पाणी' या मथळ्याखाली बातम्या प्रसिद्ध केल्या. त्या "सकाळ'च्या माध्यमातून तसेच "ट्‌विटर' व "व्हाट्‌सऍप'वर "व्हायरल' झाल्या. समस्या मांडण्यापुरता "सकाळ' मर्यादीत राहिला नाही, तर ही समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानुसार, "तनिष्कां'च्या माध्यमातून आज प्रत्यक्षात नाला खोलीकरणाचे काम सुरू झाले. त्यामुळे ग्रामस्थांनी "सकाळ'चे कौतुक केले.

Web Title: Sakal relief fund work in chalisgaon