गृहोपयोगी वस्तू खरेदी आनंद लुटण्यास सुरवात!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

जळगाव - विविध नामांकित कंपन्या आणि ब्रॅंडच्या वस्तूंचे पर्याय उपलब्ध करून देणारा शॉपिंग उत्सवात खरेदीसाठी जळगावकरांची शिवतीर्थ मैदानावर लगबग पाहण्यास मिळू लागली आहे. सण, उत्सव असो किंवा नसो शॉपिंगचा मनमुराद आनंद नेहमीच घेतला जातो. यामुळेच की काय ‘सकाळ’ शॉपिंग उत्सवात खरेदीचा आनंद लुटण्यास अनेकांनी सुरवात केली आहे.

जळगाव - विविध नामांकित कंपन्या आणि ब्रॅंडच्या वस्तूंचे पर्याय उपलब्ध करून देणारा शॉपिंग उत्सवात खरेदीसाठी जळगावकरांची शिवतीर्थ मैदानावर लगबग पाहण्यास मिळू लागली आहे. सण, उत्सव असो किंवा नसो शॉपिंगचा मनमुराद आनंद नेहमीच घेतला जातो. यामुळेच की काय ‘सकाळ’ शॉपिंग उत्सवात खरेदीचा आनंद लुटण्यास अनेकांनी सुरवात केली आहे.

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे शिवतीर्थ मैदानावर सहा दिवसीय शॉपिंग उत्सव, ऑटो एक्‍स्पो व फूड फेस्टिव्हलला कालपासून सुरवात झाली. शॉपिंग उत्सवाचे नेहमीच आकर्षण असल्याने विविध वस्तू खरेदीची एक संधी उपलब्ध असल्याने आजच्या दुसऱ्याच दिवशी जळगावकर खरेदीसाठी आले होते. यावर्षी ११ ते १६ जानेवारीदरम्यान शहरातील शिवतीर्थ मैदानावर शॉपिंग उत्सव होणार आहे. महोत्सवाविषयीची उत्सुकता गेल्या काही दिवसांत निर्माण झाली होती. ती संपली असून खरेदीचा आनंद घेण्यासाठी प्रदर्शनाला भेट दिली. 

महिलांची उपस्थिती 

जळगावचा आपला उत्सव अर्थात ‘सकाळ शॉपिंग उत्सव’. उत्सव म्हणजे महिलांसाठी गृहोपयोगी वस्तूंचा खजिनाच ठरतो; त्यातच ‘सकाळ’चा शॉपिंग उत्सव म्हणजे खरेदीचे अनेक पर्याय असल्याने आज सकाळपासूनच खरेदीसाठीची रीघ सुरू झाली होती. प्रत्येक स्टॉलवर घरात नसलेल्या आवश्‍यक वस्तू, सजावटीचे साहित्य, स्वयंपाकघरातील रोज वापरातील वस्तू घेणे अनेकांनी पसंत केले. विशेष करून महिलांची गर्दी अधिक दिसून आली. सायंकाळी खास प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली पाहण्यास मिळाली.

‘फूड फेस्टिव्हल’लाही गर्दी 
महोत्सवात खास खवय्यांसाठी स्वतंत्र फूड फेस्टिव्हल अर्थात खाऊगल्ली आहे. या खाऊगल्लीत विविध खाद्यपदार्थ असून, खवय्यांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. पाणीपुरी, भेळ, दाबेली, कढी- फुणके, अप्पे, चायनीज, वडापाव, गरमागरम भजी, कचोरी, चने, मसाला पापड आणि आइस्क्रीम आदी पदार्थांवर नागरिक आस्वाद घेण्यासाठी गर्दी करत आहेत.

चार दिवस आणखी पर्वणी 
शिवतीर्थ मैदानावर सहा दिवसांचा शॉपिंग महोत्सव भरला आहे. महोत्सव सुरू होऊन दोन दिवस झाले असले, तरी आणखी चार दिवस दिवसांचा हा महोत्सव बाकी आहे. यामुळे या चारही दिवसांत एका आगळ्यावेगळ्या प्रदर्शनातून खरेदीची संधी जळगावकरांना उपलब्ध राहणार असून, खरेदीचा आनंद घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

Web Title: sakal shopping festival in jalgaon