खबरदार... वाहनचालकांनो 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

बाईकरायडर्स, मद्यपी चालकांवर होणार लक्ष्य 

नाशिक : शहरातील बेशिस्त वाहनचालक व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना जलदगतीने लक्ष्य करण्यासाठी शहर पोलिस वाहतूक शाखेच्या ताफ्यात दोन अत्याधुनिक यंत्रणेने सज्ज असे वाहन दाखल झाले आहे. प्रत्येकी तीन ते सहा लाख किंमत असणारी अत्याधुनिक साधने या वाहनात बसविण्यात आली आहेत. यामुळे वाहनाचा वेग, मद्य पिवून वाहन चालविणे, काळ्या काचांची दृष्यमानता (गडदपणा) मोजणे शक्‍य होणार आहे. 

नाशिक पोलीस आयुक्तालयात आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील, वाहतूक विभागाच्या उपायुक्त पौर्णिमा चौघुले यांनी वाहन चालवून उद्‌घाटन केले. यावेळी आयुक्त श्री. नांगरे-पाटील म्हणाले, शासनातर्फे राज्यातील काही शहरांमध्ये शहरांतील बिघडती वाहतूक व्यवस्थेत अधिक सुधार होण्यासाठी अत्याधुनिक वाहने दिली आहेत. यात व्हिडिओ मॉनिटरिंग स्पीडोगन आहेत. ज्याचा उपायोग भरधाव जाणाऱ्या वाहनांचा वेग मोजण्यासाठी होणार आहे. टिन्ट मीटरद्वारे काळ्या काचांची दृष्यमानता मोजता येणार आहे. तसेच ब्रेथ ऍनालायझर असल्याने मद्यसेवन करून वाहन चालविणाऱ्यांची जागेवरच चाचणी करून त्यांच्यावर कारवाई करणे शक्‍य होणार आहे. या वाहनांद्वारे शहरातील वाहतुक नियंत्रणासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे ते म्हणाले. 
यावेळी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी यांनी वाहनांतील यंत्रणांची चाचणी करून दाखविली. यावेळी दिंगबर आखाड्याचे महंत रामकिशोरदास, उपायुक्त अमोल तांबे, विजय खरात, वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, सहाय्यक आयुक्त अशोक नखाते, पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, डॉ. अंचल मुदगल, साजन सोनवणे, भारतकुमार सूर्यवंशी उपस्थित होते. 

अत्याधुनिक वाहनातील सुविधा 
* व्हिडीओ बेस्ड लेजर मॉनिटरींग सिस्टम (लेजर स्पीडगन) 
* लेजर स्पीड डिवाईस 
* हार्ड, एचडी कॅमेरा (लॉंग फोकस) 
* व्हिडीओ रेकॉर्डर 
* ब्रेथ ऍनालायझर 
* टिन्ट मीटर इन्स्पेक्‍टर 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashik-bikerayders-trafficvan-crimenews