चंदन चोरट्यांच्या टोळीला मोक्का 

Residential photo
Residential photo

अकादमीसह औद्योगिक वसाहतीतील चंदनाच्या झाडांची चोरी 

नाशिक : औद्योगिक वसाहतीतील सुरक्षारक्षकाला धारदार शस्त्राचा धाक दाखवून चंदनाची झाडे तोडून चोरी करणाऱ्या चौघांविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. संशयितांचे दोन साथीदार अद्यापही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

लक्ष्मण तात्या पवार (22, रा. आईनगर झोपडपट्टी, पाथर्डीगाव, नाशिक), संजय माणिक जाधव (25, रा. भवानी मंदिरासमोर, पाथर्डीगाव, नाशिक), शिवाजी उत्तम जाधव (25), उत्तम नारायण जाधव (55, दोघे रा. नानेगाव रोड, पळसे शिवार, नाशिकरोड) अशी अटकेतील संशयितांची नावे असून रामा विलास कोळी (40, रा. पाथर्डीगाव चौफुली, नाशिक), तात्या तुकाराम पवार (50, रा. शेनीतगाव, ता. इगतपुरी) हे दोघे फरार आहेत. 
सातपूर औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा टुल अँड डाय प्लांट परिसरात गेल्या 4 ऑगस्ट 2019 रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास कंपनीच्या सुरक्षारक्षकाच्या मानेवर धारदार करवतीचा धाक दाखवून या टोळीने चंदनाची झाड तोडून चोरून नेली. याप्रकरणी सातपूर पोलिसात सशस्त्र दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
शहरातील देवळाली कॅम्प, उपनगर, सातपूर, गंगापूर, मुंबईनाका पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील आणि महाराष्ट्र पोलीस अकादमी, सैन्य दलाच्या संवेदनशील परिसरातूनही याच टोळीने चंदन वृक्ष चोरी केले होते. संशयित लक्ष्मण पवार हा टोळीचा म्होरक्‍या असून संजय जाधव यासह तो शहरात दिवसा फिरून करायचा. त्यानंतर संगनमताने ही टोळी चंदनाचे वृक्ष तोडून चोरी करीत होते. चोरी करताना लक्ष्मर पवार हा त्याच्या साथीदारांना बनावट दुसऱ्या नावाने हाका मारून सुरक्षारक्षकांची दिशाभूल करायचे. तर उत्तम जाधव हा चोरलेल्या झाडांची विक्री करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त प्रदीप जाधव यांनी तपास करीत या चंदन चोरी करणाऱ्या टोळीवर मोक्का अंतर्गत प्रस्ताव तयार करीत न्यायालयाद सादर केला आहे. यामुळे संघटीतपणे गुन्हे करणाऱ्या टोळींवर अंकुश बसेल असा विश्वास पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com