पत्नीच्या खूनप्रकरणी आरोपीला जन्मठेप 

Residential photo
Residential photo

नाशिक जिल्हा न्यायालय : 50 हजारांसाठी गळा आवळून केला खून 

नाशिक : माहेराहून पीकअप वाहनासाठी 50 हजार रुपये आणण्यासाठी छळ करून पत्नीला गळफास देऊन ठार केल्याप्रकरणी आरोपी पतीला जिल्हा न्यायालयाने जन्मठेप व 26 हजार रुपयांची शिक्षा ठोठावली. 12 मे 2012 च्या मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी कैलास गोपाळ चव्हाण (40, रा. गोभापूर, ता. कळवण, जि. नाशिक) याने पत्नीचा खून केला होता. 

सुनिता कैलास चव्हाण (25, रा. गोभापूर, ता. कळवण) असे मयत विवाहितेचे नाव आहे. सुनिता हिचा भाऊ गोपीनाथ अंबादास क्षत्रिय यांच्या फिर्यादीनुसार, आरोपी कैलास चव्हाण याने सुनिता हिच्याकडे पिकअप वाहन घेण्यासाठी माहेराहून 50 हजार रुपये आणण्याची मागणी केली होती. त्यासाठी तो वारंवार तिला मारहाण रकीत छळत होता. 12 मे. 2012 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी कैलास याने त्याच कारणावरून मारहाण करीत दोरीने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने तिच्या अंगावर रॉकेल ओतले होते. याप्रकरणी कळवण पोलिसात खुन, हुंडाबळीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक सोनवणे यांनी गुन्ह्याचा तपास करीत आरोपीला अटक केली. जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. 
सदरील खटल्याचे कामकाज जिल्हा सत्र न्यायधीश श्रीमती सुनिता नायर यांच्यासमोर चालले. यावेळी सरकारी पक्षातर्फे ऍड. कल्पक निंबाळकर व त्यानंतर ऍड. डॉ. सुधीर कोतवाल यांनी कामकाज पाहताना 8 साक्षीदार तपासले. न्यायालयात आरोपीविरोधातील पुरावे सिद्ध झाल्याने त्यास जन्मठेप व 26 हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक उपनिरीक्षक प्रमोद आढाव, कैलास पाटील यांनी पाठपुरावा केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com