पांढुर्ली ग्रामपंचायत निवडणुकीच्या मारहाणीत दोघांना शिक्षा 

Residential photo
Residential photo

नाशिक : पांढुर्ली (ता. सिन्नर) येथे ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या वादातून हाणामारीची घटना घडली होती. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने दोघांना शिक्षा ठोठावली. आरोपी अशोक पूंजा पवार (56) यास सहा महिन्यांची साधी कैद तर त्यांचा मुलगा शिवाजी अशोक पवार (35, रा. पांढुर्ली, ता. सिन्नर) यास 5 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. दरम्यान, न्यायालयाने शिक्षा सुनावताच आरोपी अशोक पवार हे कक्षामध्येच चक्कर येऊन पडले. त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

सदरची घटना 4 ऑगस्ट 2015 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली होती. साहेबराव लहानू पवार (रा. पांढुर्ली) यांच्या फिर्यादीनुसार, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्यांचा भाऊ व आरोपी यांच्यात वाद झाला होता. दुसऱ्या दिवशी 4 ऑगस्ट 2015 रोजी रात्री आठच्या सुमारास त्यांचा भाऊ किराणा दुकानात जात असताना आरोपी अशोक पवार, शिवाजी पवार यांनी त्याच्याशी पुन्हा वाद घालत मारहाण सुरू केली. त्यावेळी साहेबराव पवार हे मदतीला धावले असता, आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमविली. तसेच तलवार-कोयत्याने जीवघेणा हल्ला केला होता. याप्रकरणी सिन्नर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक शिंगटे यांनी गुन्ह्याचा तपास करीत न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते. 
जिल्हा सत्र न्यायधीश एन.जी. गिमेकर यांच्यासमोर खटल्याचे कामकाज झाले. सरकारी पक्षातर्फे ऍड. श्रीमती जाधव व ऍड. श्रीमती सुप्रिया गोरे यांनी कामकाज पाहिले. यात न्यायालयाने आरोपी अशोक पवार यास सहा महिने साधी कैद व 800 रुपयांचा दंड ठोठावला, तर शिवाजी पवार यास 5 वर्ष सक्तमजूरी व 5 हजार 300 रुपयांचा दंड ठोठावला आहे. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार शिरोळे यांनी पाठपुरावा केला. दरम्यान, न्या. गिमेकर यांनी आज (ता.15) दुपारी शिक्षा सुनावताच आरोपी अशोक पवार हा कक्षामध्येच चक्कर येऊन पडला. त्यास वैदयकीय उपचारासाठी तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com