गावठी कटट्यासह सराईत गुन्हेगार अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

ठक्कर बाजार येथून सरकारवाडा पोलिसांनी केले जेरबंद 

नाशिक : ठक्कर बाजार बसस्थानक येथे गावठी कट्टा बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्‍या आवळण्यात आल्या. सरकारवाडा पोलिसांच्या पथकाने सदरची कामगिरी केली असून त्याच्याकडून दोन गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुसे असा 57 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गणेश राजेंद्र जाधव (22, रा. शिवाजीनगर, सातपूर) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. 

सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाचे प्रवीण वाघमारे व प्रशांत मरकड यांना संशयित गणेश जाधव याची खबर मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (ता. 6) सायंकाळी ठक्कर बाजार बसस्थानक परिसरात सापळा रचण्यात आला होता. सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास संशयित गणेश जाधव आला असता, दबा धरून असलेल्या पोलिसांनी त्याला घेरले आणि पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संशयित गणेश याने पोलिसांना धक्का मारून पलायन करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा प्रयत्न फसला. पोलिसांनी त्यास जेरबंद केले. त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी कट्टा जप्त केला. पोलीस चौकशीतून त्याने घरात लपविलेला दुसरा गावठी कट्टा जप्त आणि दोन जिवंत काडतुसे असा 57 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 
संशयित गणेश जाधव हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात गंगापूर पोलिसात मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आठवड्यात दुसऱ्यांदा शहरात गावठी कट्टे पोलिसांच्या हाती लागले आहेत. संशयिताने गावठे कट्टे कोठून आणि कशासाठी आणले याची चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांनी दिली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस उपनिरीक्षक टी. एम. राठोड, हवालदार मुकेश राजपूत, प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, सुरेश शेळके, सुनील जगदाळे, नितीन नेटारे, सागर हजारी, गुणवंत गायकवाड, अरुण भोये आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 
... 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashik-crimenews