"तुमचा एक मिनिट; बदलेल एक आयुष्य' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

मानसोपचार तज्ज्ञ संघटनेच्या रॅलीने वेधले लक्ष 

नाशिक : समाजातील वाढत्या आत्महत्त्येचे प्रमाण चिंताजनक आहे. जगात प्रत्येक 40 सेकंदाला एका व्यक्ती आत्महत्त्या करतो आहे. त्यावर प्रभावी जनजागृती मोहीम राबविण्यासाठी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्ताने काढण्यात आलेल्या रॅलीने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले. जनजागृतीपर फलकांतून समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न या रॅलीतून करण्यात आला. 

जिल्ह्यातील मानसोपचार तज्ज्ञांची संघटना, नाशिक सायक्‍याट्रिक सोसायटी, जिल्हा रुग्णालय, इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. समाजात तरुण-तरुणींमध्ये आत्महत्त्येचे प्रमाण अधिक असून, "आत्महत्त्येला प्रतिबंध' या नाविन्यपूर्ण उपक्रमानुसार आंतर महाविद्यालयीन पथ नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात विविध महाविद्यालयांच्या 12 संघांनी सहभाग घेतला. यावेळी आयएमचे अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे, सायक्‍यॅट्रिक सोसायटीचे डॉ. बी. एस. व्ही. प्रसाद, डॉ. शिरीष सुळे, डॉ. उमेश नागपूरकर, डॉ. हेमंत सोनानिस, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, डॉ. निलेश जेजूरकर उपस्थित होते. 
आत्महत्या रोखण्यासाठी केवळ क्षणिक उपाययोजना न करता, त्या मागील कारण समाजाने जाणून घेणे महत्वाचे आहे. मानसिक आरोग्यविषयी जागृती ही काळाची गरज असून समाजातील सर्व घटकांना यात सामील व्हावे असे उपस्थित मान्यवरांनी मत व्यक्त केले. रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांच्या हातामध्ये जनजागृतीपर संदेश देणारे फलक होते. "तुमचा एक मिनिट, बदलेल एक आयुष्य', "साद घाला, आत्महत्त्या रोखा', "सहारा है, जिंदगी बचाए', "या जन्मावर शतदा प्रेम करावे', "से नो टू सुसाईड' असे संदेशाचे फलक शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले. या रॅलीत विविध नर्सिंग महाविद्यालयांचे विद्यार्धी, जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच आयएमए नाशिक शाखेच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्हा रुग्णालयापासून रॅलीला प्रारंभ होऊन शालिमार येथील आयएमए येथे सांगता करण्यात आली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashik-crimenews