इंदिरानगरला दोन दिवसात दोन चैनस्नॅचिंग 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

नाशिक : इंदिरानगर परिसरात गेल्या दोन दिवसात विवाहितेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून नेल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. ऐनसणासुदीच्या काळात सक्रिय झालेल्या सोनसाखळी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होते आहे. तर दुसरीकडे इंदिरानगर पोलिसांचे गस्तीपथकाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्‍न उपस्थित होतो आहे. 

नाशिक : इंदिरानगर परिसरात गेल्या दोन दिवसात विवाहितेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून नेल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. ऐनसणासुदीच्या काळात सक्रिय झालेल्या सोनसाखळी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होते आहे. तर दुसरीकडे इंदिरानगर पोलिसांचे गस्तीपथकाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्‍न उपस्थित होतो आहे. 

चेतनानगर येथे दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी घराकडे पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची पोत हिसकावून पोबारा केला. रुपाली गहिणीनाथ जाधव (रा. चेतनानगर, इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (ता.8) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्या चेतनानगरमधील त्यांच्या राहत्या शिवपॅलेस अपार्टमेंटकडे पायी जात होत्या. अनंत अपार्टमेंटसमोर त्या आल्या असता, समोरून दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांपैकी पाठीमागे बसलेल्या संशयिताने त्यांच्या गळ्याती दीड तोळ्याचे मंगळसूत्र बळजबरीने ओढून पोबारा केला. इंदिरानगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक जगदाळे हे अधिक तपास करीत आहेत. 
प्रिती उमाशंकर आळंद (रा. रवीशंकर मार्ग, इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या सोमवारी (ता.7) रात्री आठ वाजेच्या सुमारास त्या परिसरातील बजरंग सोसायटीकडून त्यांच्या राहत्या ओजस अव्हेन्यु सोसायटीकडे जात होत्या. त्यावेळी समोरून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांपैकी पाठीमागे बसलेल्या संशयिताने त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने ओढून नेले. सहाय्यक निरीक्षक भामरे हे तपास करीत असून, याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन दिवसात चैनस्नॅचिंकच्या दोन घटना घडल्याने इंदिरानगर पोलिस ठाण्याचे गस्तीपथकाच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित होते आहे. ऐनसणासुदीच्या काळात चैनस्नॅचिर्स सक्रिय झाल्याने महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashik-crimenews-chainsnatching