सिमेंट मिक्‍सरचा शॉक बसून बांधकाम मजुराचा मृत्यु 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

नाशिक : पाथर्डी फाटा परिसरात नवीन बंगल्याच्या बांधकामाच्या साईटवर सिमेंट कालविण्याचे काम सुरू असतान, सिमेंट मिक्‍सर मशिनचा शॉक बसून तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यु झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात नोंद करण्यात आली असून जिल्हा रुग्णालयात गर्दी झाली होती. 

रोहित सुनील कचरे (24, रा. दाढेगाव, पिंपळगाव खांब, ता.जि. नाशिक) असे मृत तरुणाचे नाव आहे. पाथर्डी रोडवरील एस्सार पेट्रोल पंप परिसरात नवीन बंगल्याच्या बांधकामासाठी पाया भरणाचे काम सुरू होते. त्यासाठी आज सिमेंट मिक्‍सरमध्ये माल कालवून ते खोदलेल्या पायात टाकला जात होता. सदरचे सिमेंट मिक्‍सर मशिन हे इलेक्‍ट्रिक होते. आज (ता.9) सायंकाळच्या सुमारास काम सुरू असताना, रोहीत कचरे यास मिक्‍सर मशिनसाठीच्या वायरमधून विजेचा शॉक बसला. त्याक्षणी तो कोसळला आणि बेशुद्ध झाला. मुकादम आनंद लाड याने त्यास तात्काळ उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच रोहित याचे कुटूंबिय व नातलगांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यामुळे रुग्णालयात गर्दी झाली होती. तरुण मुलाचा मृत्यु झाल्याने नातलगाच्या आक्रोशामुळे अनेकांचे मन हेलावले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashik-electricshock-crimenews