नाशिकमधील तीन मद्यविक्री दुकानांचे परवाने स्थगित 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत मद्यविक्री करणाऱ्या परवानाधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून तीन मद्यदुकानांच्या परवान्यांना स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, अवैधरित्या मद्य पुरवठा करणाऱ्या अथवा नियमभंग करणाऱ्या अनुज्ञप्तीविरोधात अनुज्ञप्ती रद्द अथवा निलंबनाची कठोर कारवाई करण्याचा इशारा विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिले आहेत. 
 
जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या आदेशान्वये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनोहर अंचुळे, निरीक्षक वसंत कौसडीकर, दुय्यम निरीक्षक योगेश चव्हाण, सी.एच. पाटील, राजेश धनवटे यांच्या पथकाने पंचवटी वाईन्स, अमर वाइन्स, नाशिक ब्रांडी हाऊस या मद्यविक्री अनुज्ञप्तीचे व्यवहार स्थगित करत, सोमवारी (ता.7) मध्यरात्री कारवाई केली. 
निवडणुकीदरम्यान ऑनलाइन पद्धतीने मदयविक्रीची माहिती भरणे, विहित वेळेत मदय अनुज्ञप्ती उघडणे व बंद करण्याच्या वेळा कसोशीने पाळणे, मद्य विक्रीच्या नोंदवह्या व मद्यसाठा अद्यावत ठेवणे याबाबत जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री परवानाधारकांना निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी अवैधरित्या मद्यविकी विरोधातील तक्रारीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा टोल फ्री क्रमांक 18008333333 व व्हाट्‌सऍप क्रमांक 84220 1133 वर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashik-exise-crimenews