विटांच्या आड दडवलेला 27 लाखांचा अवैध मद्यसाठा हस्तगत 

live photo
live photo

राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय पथकाचा छापा 

नाशिक  : हतगड शिवारातील सावमाळ (ता. सुरगाणा) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने सुमारे 27 लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा छापा टाकून जप्त केला. सदरचा मद्यसाठा हा विटांच्या आच्छादून आतमध्ये दडवून ठेवण्यात आलेला होता. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. 

सुनील लक्ष्मण खंबायत (21, रा. हतगड, ता. सुरगाणा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुम असून, याकाळात अवैध मद्यांचा वापर केला जाण्याची शक्‍यता गृहित धरून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कसून नाकाबंदी करण्यात आलेली आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक ऋषिकेश फुलझळके यांना हतगत शिवारातील सावमाळ याठिकाणी मद्याच्या अवैधरित्या साठा करण्यात आल्याची खबर मिळाली होती. 
विभागीय उपायुक्त अर्जून ओहाळ यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. एम. फुलझळके, दुय्यक निरीक्षक देवदत्त पोटे, एस. एस. रावते, दीपक आव्हाड, गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके, लोकेश गायकवाड, सोन्याबापु माने, रामकृष्ण झनकर, गोकुळ परदेशी यांच्यासह कळवण विभागाचे निरीक्षक सोनवणे व जवान वाईकर, बोरगाव सीमा तपासणी नाक्‍याचे दुय्यम निरीक्षक अमोल पाटील, सहायक दुयम निरीक्षक गायकवाड, जाधव यांच्या पथकाने रविवारी (ता.13) रात्री सावमाळ येथे छापा टाकला. त्यावेळी संशयिताने अवैधरित्या केलेला मद्यसाठा बांधकामाच्या विटांखाली दडवून ठेवलेला होता. अरुणाचल प्रदेश आणि पंजाब राज्यात विक्रीसाठी परवानगी असलेला 574 बॉक्‍स मद्यसाठा पथकाच्या हाती लागला. यात रॉयल ब्लयु व्हिस्कीचे 180 मिली क्षमतेच्या 14 हजार 112 सीलबंद बाटल्या, पंजाबमध्ये तयार केलेल्या व केंद्रशासीत प्रदेशात विक्रीस परवानगी असलेल्या बिअरचे 279 बॉक्‍स व त्यात 6 हजार 696 टिन आढळून आले. सदरचा मद्यसाठ्याची किंमत 26 लाख 71 हजार 560 रुपये आहे. याप्रकरणी विभागाने संशयित खंबायत विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच संशयित खंबायत यास मद्यसाठा पुरवणारा व विकत घेणाऱ्यांचा शोध सुरु आहे. 
 
एक्‍साईजची मोठी कारवाई 
अलिकडच्या काळातील तसेच आचारसंहिता काळातील राज्य उत्पादन शुल्क विभागाची आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. संशयित खंबायत याने अवैध मद्यसाठ्यावर बांधकामाच्या विटा रचलेल्या होत्या. त्यामुळे बाहेरून ती विटभट्टी असल्याचेच भासविण्यात आले होते. प्रत्यक्षात आतमध्ये मद्याच्या 574 खोके पथकाच्या हाती लागले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com