रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प भविष्याची गरज 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

महाराष्ट्र पोलीस अकादमीत प्रकल्पाचे उद्‌घाटन 

नाशिक : भविष्यात पाण्याचा प्रश्‍न जागतिक समस्या ठरणारी आहे. त्यासाठी आत्तापासूनच वॉटरस्टोअरेज, वॉटर रिचार्ज, वॉटर रिसायकलिंग करण्याची आवश्‍यकता असून राज्यातील पोलीस अकादमींमध्येच नव्हे तर गावोगावी जाऊन रेनवॉटर हार्वेस्टिंग यासारखे पर्यावरणपूरक प्रकल्प राबविण्याचे गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे गृहविभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार यांनी केले. 

त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये 178.36 मिलियन लिटर पाण्याच्या हार्वेस्टिंग प्रकल्पाच्या उद्‌घाटनप्रसंगी श्री.संजयकुमार बोलत होते. यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, अपर पोलीस महासंचालक संजय सक्‍सेना, लार्ड इंडिया प्रा.लिचे कार्यकारी संचालक विलास ढवळे, सेंटर फॉर इन्व्हारमेंटल रिसर्च ऍण्ड एज्युकेशनचे संस्थापक डॉ. रोशन पारडीवाला, पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील, विभागीय आयुक्त राजाराम माने, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. 
पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल म्हणाले, एकीकडे पाणी-वीज यावरून वाद होत असताना दुसरीकडे पुर आणि दुष्काळ अशीही परिस्थिती आहे. भविष्यात पाण्याचा प्रश्‍न बिकट समस्या होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उभा राहील. यासाठी आत्तापासून पर्यावरणपुरक रेनवॉटर हार्वेस्टिंगसारखे प्रकल्पाबाबत जनजागृतीची गरज आहे. राज्यातील पोलीस प्रशिक्षण संस्था, एसआरपीएफ, पोलीस मुख्यालये, आयुक्तालय याठिकाणीही हे प्रकल्प सुरू केले जातील असे सांगितले. अकादमीच्या संचालक अश्‍वती दोरजे यांनी प्रकल्पाची माहिती देत, आभार मानले. 

महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये लॉर्ड इंडिया प्रा.लि.च्या अर्थसहाय्य व सेंटर फॉर इन्व्हारमेंटल रिसर्ज ऍण्ड एज्युकेशन या संस्थेच्या मदतीने रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प तयार करण्यात आला. यात 3 तलावांची व्याप्ती व खोली वाढविणे, 1 नवीन तलाव, 2 विहिरी तयार करणे, नवीन रिचार्ज पीटस्‌ खोदणे आदी कामे पावसाळ्यापूर्वीच तयार करण्यात आली. त्यामुळे 178.36 मिलियन लिटर पाण्याचे हार्वेस्टिंग करण्यात आले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashik-MPA-news