महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार 

Residential photo
Residential photo

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी शिवारात भरधाव वेगातील अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्या मादी ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सदरचा अपघात आज (ता.7) पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडला. 

मुंबई-आग्रा महामार्गावरील चुंचाळे शिवारातील खत प्रकल्प ते इगतपुरीपर्यंत बिबट्यांचा वावर नेहमीच आढळून येतो. सदरचा परिसर बिबट्यांचा नैसर्गिक अधिवास मानला जातो. त्यामुळे अनेकदा बिबटे रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना वाहनांच्या धडकेत गतप्राण होण्याच्या घटना घडताहेत. आज (ता.7) पहाटेच्या तीन वाजेच्या सुमारास सुमारे अडीच वर्षांची बिबटया मादी रस्ता ओलांडत होती. त्याचवेळी मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जाणा-या भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने तिला जोरदार धडक दिली. या धडकेत बिबट्या मादीचा जागीच मृत्यु झाला. यानंतर या मार्गावरून प्रवास करणाऱ्या काही जागरूक वाहनचालकांनी नाशिक शहर पोलीस नियंत्रण कक्षाला अपघाताची माहिती दिली. नियंत्रण कक्षातून तात्काळ नाशिक पश्‍चिम विभागाचे वनपाल मधुकर गोसावी यांना अपघाताबद्दल माहिती देण्यात आली. सदरची माहिती मिळताच श्री. गोसावी हे त्यांच्या वनरक्षकांसह घटनास्थळी धाव घेत पोहोचले. जागेवर बिबटया मादीचा मृतदेहाचा पंचनामा करून ताब्यात घेतला. तर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर गंगापूर रोपवाटिकेत मृतदेहाचे दहन करण्यात आले आहे. दरम्यान, महामार्गावरील वेग मर्यादेमुळे अनेक वन्यप्राण्यांना आपला जीव गमवावा लागतो आहे. वाहनांच्या वेगमर्यादेचे वारंवार उल्लंघन होत असल्याचे वनविभागाकडून रस्ता महामार्ग प्राधिकरणकडेही पाठपुरावा केला आहे. तसेच, ठिकठिकाणी वाहनचालकांच्या जनजागृती केली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com