ऑनलाईन खरेदीच्या बतावणीतून लाखोंचा गंडा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

शहरातील 46 जणांची केली आर्थिक फसवणूक 

नाशिक : ओएलएक्‍स सारख्या ऑनलाईन वस्तू खरेदी-विक्रीच्या माध्यमातून अज्ञात संशयिताने वस्तू खरेदीचा बहाणा करून वस्तू विक्रेत्यांनाच सव्वा आठ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. संशयिताने शहरातील 46 जणांना चूना लावला असून याप्रकरणी सायबर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

शहरातील 46 जणांची केली आर्थिक फसवणूक 

नाशिक : ओएलएक्‍स सारख्या ऑनलाईन वस्तू खरेदी-विक्रीच्या माध्यमातून अज्ञात संशयिताने वस्तू खरेदीचा बहाणा करून वस्तू विक्रेत्यांनाच सव्वा आठ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. संशयिताने शहरातील 46 जणांना चूना लावला असून याप्रकरणी सायबर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

ऑनलाइन संकेतस्थळ आणि ऍप्सवरून विविध वस्तू खरेदी करण्याच्या बहाण्याने संशयित भामट्यांनी शहरातील 46 जणांना 8 लाख 31 हजार 730 रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 
याप्रकरणी मुकुंद रघुनाथ पदनाभी (58, रा. पाथर्डी रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनीा गेल्या 2 ऑक्‍टोबर रोजी ओएलएक्‍स या संकेतस्थलावर काही वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या. ती वस्तू पाहून खरेदी करण्याच्या बहाण्याने अज्ञात संशयिताने मुकुंद पदनाभी यांच्याशी संपर्क साधला. तसेच, सदरील वस्तूचे पैसे देतो, असे सांगून एक लिंक श्री. पदनाभी यांना पाठविली. पैसे आल्याची लिंक आल्याचे समजून, श्री. पदनामी यांनी सदरची लिंक ओपन केली आणि त्यावरील माहिती भरली. मात्र सदरची लिंक पैसे पाठविण्याची नसू,प्पिैसे मागवल्याची होती. त्यांनी त्यांनी माहिती भरताच त्यांच्या बॅंक खात्यातून पैसे संशयिताच्या खात्यावर वर्ग झाली. तेव्हा श्री. पदनाभी यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. 
याचप्रमाणे, संशयिताने शहरातील तब्बल 45 जणांना ऑनलाइन खरेदी-विक्रीच्या माध्यमातून 8 लाख 31 हजार 730 रुपयांना गंडविल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी नाशिक सायबर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराज बोरसे हे करीत आहेत. 

अशी आहे मोडस 
ओएलएक्‍स संकेतस्थळावरील वस्तू खरेदीचा बहाणा करून संशयित विक्रेत्यांना एक लिंक पाठवितात. त्या लिंकवरील माहिती भरल्यावर पैसे मिळतील अशी बतावणी संशयित करतात. त्यामुळे वस्तू मालकाने त्या लिंकवरची माहिती भरताच, संशयित 10 हजार रुपयांहून अधिकची रक्कम ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या बॅंक खात्यात वर्ग करताहेत. यासाठी गुगल पे, फोन पे, पेटीएम व बॅंक लिंक यांचा वापर संशयित करीत आहेत. तरी, आलेल्या लिंकची खात्री करूनच आर्थिक व्यवहार करण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashik-online-crimenews