हिवाळे टोळीच्या म्होरक्‍यासह 9 गुंडांची तडीपारी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

नाशिक : शहरात दहशत पसरवून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या भीमवाडीतील कुख्यात हिवाळे टोळीच्या प्रमुखासह 9 सराईत गुंडांची एका वर्षासाठी तर, पंचवटीतील एकाची दोन वर्षांसाठी शहर-जिल्ह्यातून तडीपारी करण्यात आली आहे. परिमंडळ एकचे उपायुक्त अमोल तांबे यांनी सदरची कारवाई केली आहे. 

नाशिक : शहरात दहशत पसरवून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या भीमवाडीतील कुख्यात हिवाळे टोळीच्या प्रमुखासह 9 सराईत गुंडांची एका वर्षासाठी तर, पंचवटीतील एकाची दोन वर्षांसाठी शहर-जिल्ह्यातून तडीपारी करण्यात आली आहे. परिमंडळ एकचे उपायुक्त अमोल तांबे यांनी सदरची कारवाई केली आहे. 

हिवाळे टोळीचा प्रमुख नितीन धुराजी हिवाळे (19), विश्‍वास उर्फ सोनु सुभाष कांबळे (18), भीमा रामभाऊ पाथरे (18), सुरज तुळशिराम लहाडे (21), योगेश धुराजी हिवाळे (23), अमोल पांडुरंग कोळे (23), श्‍याम मच्छिंद्र चव्हाण (21) व शाहू उर्फ शाहीर आसाराम जावळे (21, सर्व रा. भीमवाडी, गंजमाळ, नाशिक) अशी तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुंडांची नावे आहेत. तर दिंडोरीरोड परिसरातील गणेश तानाजी पवार (19, रा. कालिकानगर, दिंडोरीरोड, पंचवटी) या सराईत गुंडाची दोन वर्षांसाठी तडीपारी करण्यात आली आहे. 
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहर पोलीसांकडून सराईतांची धरपकड करीत कारवाई सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवरच सदरची तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. सरकारवाडा आणि भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिवाळे टोळीची दहशत होती. टोळीचा म्होरक्‍या नितीन हिवाळे व त्याच्या साथीदारांवर शरीराविरूद्ध, तसेच मालाविरूद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. अनेकदा समज देऊनही त्यांच्यात सुधारणा न झाल्याने पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी चौकशी करीत हिवाळे टोळीच्या म्होरक्‍यासह 9 जणांना एक वर्षासाठी शहर-जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचप्रमाणे, गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या गणेश पवार यासही दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. 
पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ एकमधून आत्तापर्यत 161 गुंडांची तडीपारी करण्यात आली आहे तर, 62 गुंडांच्या तडीपारीच्या प्रस्तावाची चौकशी सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात आणखीही काही गुन्हेगारांची तडीपारी होण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashik-tadipar-crimenews