नाशिकमधून हिवाळे टोळीसह 17 गुंडांची तडीपारी 

Residential photo
Residential photo

नाशिक : विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली असून, या काळात पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ एकमधून हिवाळे टोळीसह 17 सराईत गुंडांची शहर-जिल्ह्यातून तडीपारी करण्यात आली आहे. गुंडांकडून विधानसभा निवडणुकीदरम्यान अशांतता पसरविण्याची वा कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याची शक्‍यता असल्याने पोलिसांनी सदरची कारवाई केली. 

विधानसभा निवडणुकीचे वातावरण अंतिम टप्प्यात असून, याकाळात कोणताही अनूचित प्रकार घडण्याची शक्‍यता आहे. त्यापार्श्‍वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीसांकडून दक्षता घेतली जात आहे. त्याच अनुषंगाने गेल्या आठवड्यात परिमंडळ एकचे उपायुक्त अमोल तांबे यांच्या आदेशानुसार, भद्रकालीतील हिवाळे टोळीतील 9 गुंडांची शहर-जिल्ह्यातून एका वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. तर, आणखी 8 गुंडांची तडीपारी करण्यात आली आहे. यात पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील गणेश तानाजी दातार (19, रा. कालिकानगर, दिंडोरीरोड), विकी कीर्ती ठाकूर (24, रा. गाजवे चाळ, पेठरोड), राहुल भिकन कासार (21, रा. मायको दवाखान्याजवळ, पंचवटी), काळू नारायण डंबाळे (20,रा. गजानन चौक, फुलेनगर) या चौघांची 2 वर्षांसाठी; मुस्तुफा पापा सय्यद (32, रा. मायको दवाखान्याजवळ, फुलेनगर), कृष्णा सतीश वाघ (21, रा. शिंपीचाळ, पेठरोड), सोनल उर्फ चिवड्या दशरथ बागड (20, रा. कोळीवाडा, पंचवटी) या तिघांची 1 वर्षांसाठी तर, आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रवीण लक्ष्मण सावळे (21,रा. निलगिरी बाग, आडगाव) यास 6 महिन्यांसाठी शहर-जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. 
गेल्या जानेवारीपासून आत्तापर्यंत परिमंडळ एकमधून 83 सराईत गुन्हेगारांची तडीपारी करण्यात आली आहे. प्रामुख्याने गंभीर स्वरुपाच्या एकापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांविरोधात पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या आदेशानुसार तडीपारीची कारवाई केली जात आहे. 

सध्या विधानसभा निवडणुकीमुळे शहरात कोणत्याही प्रकारच्या शांततेचा भंग होऊ नये. त्यापार्श्‍वभूमीवर सराईत गुंडांविरोधात तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. 
- अमोल तांबे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक, नाशिक. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com