रामकुंडावर आज रावणदहन; वाहतूक मार्गात बदल 

Residential photo
Residential photo

नाशिक : दसऱ्या निमित्ताने उद्या (ता.8) गोदाघाटावरील रामकुंडावर रावणदहनाचा कार्यक्रम होतो. यासाठी वाहतूक पोलीस शाखेतर्फे उद्या दुपारी 3 ते रात्री दहा वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. 
 
दसऱ्यानिमित्ताने उद्या (ता.8) चर्तुसंप्रदाय आखाडातर्फे रावणदहनाचा कार्यक्रम रामकुंडावर होतो. आखाड्यापासून राम-लक्ष्मण सेनेच्या मिरवणुकीला प्रारंभ सायंकाळी 6 वाजता होतो. मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, शिवाजी चौक, सीतागुंफा रोडने काळाराम मंदिर, सरदार चौक, साईबाबा मंदिर ते रामकुंडावरील वाहनतळ मैदानावर मिरवणूक येते. याचठिकाणी राम-रावण युद्ध होऊन रावणदहन होत असते. या कार्यक्रमासाठी शहर-परिसरातून सुमारे 10 ते 12 हजार भाविकांची गर्दी होत असते. 
तसेच, ओझर येथील नवरात्र मंडळांच्या देवीमूर्तीचे रामकुंडावर विसर्जन दसऱ्याच्या दिवशी केले जाते. दोन्ही कार्यक्रम हे सायंकाळी रामकुंड परिसरात होत असल्याने दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत याठिकाणी भाविकांची गर्दी होऊन वाहतूक कोंडीची समस्या उद्‌भवण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस शाखेने दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत मालेगाव स्टॅण्डकडून रामकुंड, सरदार चौक ते गाडगेमहाराज पुलापर्यंतची वाहतूक एकेरी सुरू ठेवण्यात येणार आहे. तर गाडगे महाराज पुलाकडून मालेगाव स्टॅण्डकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतुकीला प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. गणेशवाडी-काट्या मारुती पोलीस चौकी, निमाणी बसस्थानक-पंचवटी कारंजामार्गे वाहने मार्गस्थ होतील. मात्र पोलीस वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दलाच्या वाहनांना या मार्गावर प्रवेशबंदी नसेल असे आदेश वाहतूक पोलीस शाखेचे उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी यांनी दिले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com