विवाहितेवर बलात्कार 

Residential photo
Residential photo

नाशिक : शिखरेवाडीतील विवाहितेवर वारंवार बलात्कार करून एकाने तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पीडित विवाहितेच्या तक्रारीनुसार, संशयित निलेश दिनकर उन्हवणे (34, रा. शिखरेवाडी) याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार संशयित निलेश याने 2013 पासून तिचा पती घरी नसताना वारंवार बलात्कार केला. तसेच कोणाला काही सांगितल्यास समाजात बदनामी करण्याची धमकी दिली. त्याचप्रमाणे गेल्या रविवारी (ता.13) रात्री नऊच्या सुमारास शिखरेवाडी येथे पीडिता पायी जात असताना संशयिताने तिला अडविले आणि, न्यायालयात तुझ्या नवऱ्याच्या बाजूने साक्ष देऊ नये. आणि माझेही नाव घेऊ नको. मला त्या खटल्यातून निर्दोष सोड अशी दमदाटी करून पीडितेस मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मनिषा राऊत करीत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com