ठक्कर बाजार येथून ऍक्‍टिवा चोरणारा गजाआड 

Residential photo
Residential photo

नाशिक : गेल्या महिन्यात ठक्कर बाजार बसस्थानक येथील पार्किंगमध्ये अडकलेली महिलेची ऍक्‍टिव्हा बाहेर काढून देण्याचा बहाणा करीत, ती ऍक्‍टिव्हा घेऊनच पोबारा करणाऱ्या संशयिताला अखेर सरकारवाडा पोलिसांनी अटक केली. सागर केवल पाटील (30, रा. देवगट, ता. मालेगाव, जि. नाशिक) असे संशयित दुचाकी चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून 70 हजार रुपयांच्या चार चोरीच्या दुचाक्‍या जप्त करण्यात आल्या आहेत. 

गेल्या 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच - सहा वाजेच्या सुमारास प्रतिक्षा प्रविणकुमार संचेती (रा. प्रमोद महाजन गार्डनजवळ, गंगापूररोड) यांनी ठक्कर बाजार बसस्थानकाच्या पार्किंगमध्ये ऍक्‍टिव्हा (एमएच 15 डीक्‍यु 0887) पार्क केली होती. त्यानंतर त्या परत आल्या असता, त्यांची ऍक्‍टिवा पार्किंगमधील वाहनांमध्ये अडकून पडली होती. त्यावेळी संशयित सागर पाटील याने त्यांना ऍक्‍टिव्हा बाहेर काढण्यासाठी मदतीचा बहाणा केली आणि त्यांचे लक्ष विचलित करीत ऍक्‍टिव्हासह पोबारा केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
याबाबत पोलिसांनी बसस्थानक आवारातील सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. तर संशयितांसंदर्भातील खबर पोलीस शिपाई गुणवंत गायकवाड यांना मिळाली असता, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून त्यास गजाआड केले. त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाक्‍या जप्त करण्यात आल्या आहेत. संशयिताने गुजरातमधूनही पॅशन प्रो दुचाकी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदरची कामगिरी गुन्हाशोधचे हवालदार मुकेश राजपुर, सुरेश शेळके, प्रवीण वाघमारे, राजेंद्र शेळके, प्रशांत मरकड, सुनील जगदाळे, अरुण भोये यांनी बजावली. 

हस्तगत दुचाक्‍या 
ऍक्‍टिवा (एमएच 15 डीक्‍यु 0887),

सीडी डिलक्‍स (एमएच 15 सीएच 4696),

स्प्लेंडर (एमएच 15 सीवाय 5342),

पॅशन प्रो (जीजे 01 एसक्‍यु 7880) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com