वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीस्वार ठार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

नाशिक : सिटी सेंटर मॉल-गोविंदनगर रस्त्यावर भरधाव वेगातील दुचाकी संरक्षण भिंतीवर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर, दुसऱ्या घटनेत अंबड औद्योगिक वसाहतीतील पोलीस चौकीसमोर आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत तरुण दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मुंबई नाका व अंबड पोलिसात अपघाताचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास सिटी सेंटर मॉलकडून गोविंदनगरकडे भरधाव वेगातील दुचाकी इमारतीच्या कंपाऊंडला धडकल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. दिनेश काशिनाथ चौधरी (44, रा. सुमंगल अपार्टमेंट, शांतीपार्क, उपनगर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. दिनेश चौधरी हे रविवारी (ता.8) मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास डोक्‍यात हेल्मेट घालून दुचाकीवरून (एमएच 15 बीसी 8259) सिटी सेंटर मॉलकडून गोविंदनगरकडे भरधाव वेगात जात होते. या मार्गावरील कर्मयोगी नगरजवळ त्यांचे दुचाकीवरून नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्यालगतच्या पिक्‍सवेअर इमारतीच्या संरक्षण भिंतीवर जाऊन आदळली. या भयानक अपघातामध्ये त्यांच्या डोके आणि शरीराला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलिसांचे गस्तीपथक त्याठिकाणी पोहोचले. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
तर, अंबड औद्योगिक वसाहतीतील पोलीस चौकीसमोर आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत 18 वर्षीय दुचाकीस्वार ठार झाल्याची दुसरी घटना घडली. निलेश अंकुश जाधव (18) असे युवकाचे युवकाचे नाव आहे. रविवारी (ता.8) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास निलेश जाधव हा दुचाकीवरून गरवारेकडून पॉवर हाऊसडे जात होता. त्यावेळी एमआयडीसी पोलीस चौकीसमोरच समोरून भरधाव वेगात आलेल्या आयशर ट्रकने दुचाकीला समोरून धडक दिली. यात निलेश याच्या डोक्‍यास गंभीर मार लागल्याने त्यास तात्काळ जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikaccidentcrimenews